
पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा, पूर्वा संघाची विजयी सलामी
भुसावळ प्रतिनिधी : शहराजवळील साकेगाव जि प शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सी.सी, तर्फे आयोजित ‘एसपीएल सीजन -२ ला बुधवारी सुरुवात झाली झाली. पहिल्या दिवशी ९३ किंग्स, योद्धा व पूर्वा संघाने सामना जिंकत विजयी सुरुवात केली. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार नीता लबडे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, गटविकास अधिकारी दारासिंग जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांच्या उपस्थितीत एसपीएल ची प्रतिकृती हवेत सोडून व चेंडू टोलवून करण्यात आली. याप्रसंगी गावातील सत्ताधारी व विरोधी सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. थेट प्रक्षेपण होणाऱ्या साकेगाव प्रीमियर लीग स्पर्धेत आनंद घेण्यासाठी मुंबई, दिल्ली, बेंगलोर अमरावती राजस्थान ,गुजरात यासह गावातील विदेशात गेलेल्या दर्शकांनीही थेट प्रक्षेपण चे आनंद घेतले.
याशिवाय स्पर्धेला भाग घेण्यासाठी अनेक शासकीय सेवेत असलेले अधिकारी ,कर्मचारी दाखल झालेले आहेत स्पर्धा च्या खेळाडूंना ऑक्शन पद्धतीने आठ संघमालकांनी पॉईंट्स टेबल नुसार घेतले होते. पहिला सामना ओम साई विरुद्ध ९३ किंग्स इलेव्हन यांच्यात झाला हा सामना ९३ किंगने १७ धावांनी जिंकला. दुसरा सामना योद्धा विरुद्ध एम्पायर यांच्यात झाला योद्धा संघाने हा सामना २८ धावाने जिंकला, तिसरा सामना पूर्वा विरुद्ध वीर भगतसिंग यांच्या झाला हा सामना पूर्वा संघाने चार गड्यांनी जिंकत पुढील फेरीत आपला विजय निश्चित केला. स्पर्धा पुढील तीन दिवस चालणार असून अंतिम सामना शनिवारी दुपारी होणार आहे.


