Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव पोलिसांचा ‘सडक सुरक्षा मित्र’ उपक्रम; ६० पोलीस अधिकारी आणि ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण!

क्राईम

जळगाव पोलिसांचा ‘सडक सुरक्षा मित्र’ उपक्रम; ६० पोलीस अधिकारी आणि ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण!

Editorial DeskBy Editorial DeskOctober 29, 2026Updated:October 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासह अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळावी आणि अनेकांचे प्राण वाचवता यावेत, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून ‘सडक सुरक्षा मित्र’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्हा पोलीस दल आणि सेव्ह लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय रस्ते सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत ६० पोलीस अधिकारी व अंमलदारांसह ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एम. जे. कॉलेज, रायसोनी कॉलेज, नूतन मराठा महाविद्यालय आणि विमुक्ती इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान वाहतूक नियमांचे पालन, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने व सुरक्षितपणे मदत कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अपघातानंतरचा पहिला प्रतिसाद योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मिळाल्यास जखमींचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते, यावर विशेष भर देण्यात आला.

‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’चे उद्दिष्ट

रस्ते अपघातांमधील मृत्यू शून्यावर आणण्याच्या उद्देशाने ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिक, विद्यार्थी आणि पोलिसांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे.

रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे, अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळवून देणे आणि जबाबदार वाहनचालक घडविणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमुळे जिल्ह्यात रस्ते सुरक्षा चळवळीला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

लाचखोरीचा पर्दाफाश! वनरक्षक २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला

October 29, 2026

पोलिसांची कामगिरी; १८ लाखांचे ९३ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत!

October 29, 2026

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add