Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल तालुक्यातून जवळ जवळ १ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातून जवळ जवळ १ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

केळी पीक विमा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि मध्यस्थींची कमाई.

यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यात शेतकऱ्यांना केळी पिक विमा मिळवून देण्यासाठी मध्यस्थी दलालांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाल्याची आणि आर्थिक लूट सुरू असल्याची तालुक्यात चर्चा आहे.शासनाने जाहीर केलेल्या केळी पिक विमा योजनेअंतर्गत यावर्षी जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यातून जवळ जवळ १ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.

अशाप्रकारे विमा काढला गेल्याने काही ठिकाणी बोगस विमे काढताना ठीक ठिकाणच्या काही मध्यस्थी,दलालांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात म्हणजे अनेक शेतकऱ्याकडून प्रति हेक्टरी १ एक हजार रुपये घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे आणि अजून काही मध्यस्थी दलाल शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करीत आहे.गेल्या दोन महिन्यापूर्वी कृषी आयुक्तालयाच्या पथकाने काही तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी मोहीम राबविली आहे.

‘एमआरसॅंक ‘तंत्रज्ञानाचा घेतला जाईल आधार….

पथकाने केलेली पडताळणी केवळ कागदोपत्री नसून ती आधुनिक
‘एमआरसॅंक’ उपग्रह या तंत्रज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी शेतात प्रत्यक्षात केली नसताना केवळ कागदपत्रे विमा भरला आहे त्यांचे पितळ वेगळे पडणार आहे तसेच काही शेतकऱ्यांनी एकाच गटात चार एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर विमा काढल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे.


त्यामुळे काही कारणास्तव थांबलेली मोहीम पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याची माहिती कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना दिली जात आहे. गेल्या हंगामात ५ ते ८ हजार शेतकरी अपात्र ठरले होते. मात्र यंदा हा आकडा हजारो संकेत जाण्याची शक्यता आहे.

केळी पिक विम्यातील ‘बोगसगिरी’ थांबवण्यासाठी कृषी विभाग आक्रमक झाला आहे. त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी आणि सरकारी निधीचा गैरवापर अपव्यय कामावर म्हणून ही विशेष तपासणी मोहीम राबविली जात आहे. यात चुकीची माहिती देऊन विमा आता भरणाऱ्यांचे विमा अर्ज सुद्धा अपात्र केले जाणार असल्याने शेतकऱ्यांना विमा मिळून देण्याच्या उद्देशाने यावल तालुक्यातील,शहरातील काही ठराविक ”मध्यस्थी” आणि दलाल हे शेतकऱ्यांची दिशाभूल करीत विमा कंपनीला प्रति हेक्टरी १ हजार द्यावे लागतील असे कारण दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत आणि काहीं शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे. याकडे जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी लक्ष केंद्रित करून मध्यस्थी दलाल कोण.? शेतकऱ्यांकडून दलालांची माहिती,नावे घेऊन चौकशी करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी सुद्धा मागणी होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add