Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट विद्यालय परिसर व विविध विभागांची पाहणी केली.

ताज्या बातम्या

साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट विद्यालय परिसर व विविध विभागांची पाहणी केली.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची नवोदय विद्यालयास भेट

जळगाव | भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन विद्यालय परिसर व विविध विभागांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.

या भेटीदरम्यान शैक्षणिक सुविधा व अध्यापन व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था, क्रीडा साहित्य व क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा व वाचनालयाची उपलब्धता तसेच विद्यार्थ्यांच्या निवास व दैनंदिन व्यवस्थेची स्थिती यांची पाहणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेतली. तसेच स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने यश संपादन करण्यासाठी प्रेरित केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण व सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राधान्याची बाब असून, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add