Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज अन् सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली

ताज्या बातम्या

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज अन् सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

शाळांना सुट्टी, सरकारी ऑफिससह दारू दुकाने राहणार बंद!

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज अन् सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मतदान होणाऱ्या १२ जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारूची दुकानेही बंद राहणार आहे. याचे  मोठे कारण म्हणजे पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या प्रचाराचा धुरळा आज थांबणार आहे. शनिवारी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळेच हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी असेल. त्याचसाठी शनिवारी १२ जिल्ह्यातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सलग तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही सरकारकडून देण्यात आलाय.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्योग, खासगी कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी शनिवारी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. उद्योग, कामगार आणि खाण विभागाने एका आदेशात म्हटले आहे की, १८ वर्षे आणि त्यावरील सर्व नोंदणीकृत मतदारांनी निवडणुकीत भाग घ्यावा. मालकांनी मतदानाच्या दिवशी कर्मचार्‍यांना मतदानाचा अधिकार वापरण्यास मदत करावी. ज्या ठिकाणी मतदान आहे,

त्या ठिकाणी नोंदणीकृत मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा मंजूर करावी. १२ जिल्ह्यातील मतदार जर इतर ठिकाणी काम करत असेल, त्यालाही सुट्टी देण्यात यावी, असेही म्हटलेय. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांना हा निर्णय लागू आहे. कारखाने, खाजगी कंपन्या, दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, निवासी हॉटेल्स, भोजनालये, थिएटर, व्यवसाय आणि औद्योगिक युनिट्स, आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेल आउटलेट्स यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थांबणार आहेय. रात्री 10 नंतर निवडणूक प्रचाराची सांगता होईल.

जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 7 फेब्रुवारीरोजी मतदान होणार आहेय. जिल्हा परिषदेसाठी 299 तर पंचायत समितीसाठी 528 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील 29 लाख 72 हजार 359 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचारावर काहीसा परिणाम झाला. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून निवडणूक चुरशीची ठरणार आहेय.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add