Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जनसेवक सन्मान सोहळा उत्साहात सेवाभाव व कृतज्ञतेचा सन्मान;

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जनसेवक सन्मान सोहळा उत्साहात सेवाभाव व कृतज्ञतेचा सन्मान;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ. दुर्गा माता सभागृहात आयोजित जनसेवक सन्मान

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ. दुर्गा माता सभागृहात आयोजित जनसेवक सन्मान सोहळा २०२६ सेवाभाव, कृतज्ञता व प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक निलेश सोमानी होते. प्रमुख उपस्थितीत विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव, श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा सचिव तथा दैनिक महासागर जिल्हा प्रतिनिधी प्रवीण बलकी यांचा समावेश होता.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकता समर्थ, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बंडू रामटेके, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, नागपूर जिल्हाध्यक्ष शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. महेश पानसे यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी स्पष्ट केली. यानंतर त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

या जनसेवक सन्मान सोहळ्यात मूल नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिक्षण, समाजकार्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याच सोहळ्यात भद्रावती तालुका अध्यक्षपदी संतोष उर्फ पवन शिवणकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करत पत्रकारांच्या हक्कांसाठी व संघटन बळकटीकरणासाठी संघ सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन थेरे यांनी केले, तर राहुल थोरात यांनी आभार मानले. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने संघटनात्मक एकतेचे दर्शन घडले. जिल्हा अध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या नेतृत्वाखाली सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add