Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक संपताच महापालिका इमारतीत मोठी दुर्घटना घडली

ताज्या बातम्या

महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक संपताच महापालिका इमारतीत मोठी दुर्घटना घडली

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मालेगाव महापालिकेची कोसळली लिफ्ट; मोठा अनर्थ टळला

नाशिक | महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक संपताच महापालिका इमारतीत मोठी दुर्घटना घडली. इमारतीतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये एकूण १८ जण अडकले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळताना थेट तळमजल्यावर न आदळता पहिल्या मजल्यावर तिचा दरवाजा अडकला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वजण सुखरुप राहिले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एकेक करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे असिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक तसेच पाच पत्रकार अडकले होते. घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या सुरक्षितता व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून लिफ्टच्या देखभालीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add