Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»वरणगावच्या सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर

ताज्या बातम्या

वरणगावच्या सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

बाळंतपणात आईचा अंत; बाळ मात्र सुखरूप

वरणगाव : शहरातील मकरंदनगर मधील रहिवाशी दिनकर हरी सोनवणे (सेवा निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी) यांच्या लहान सुनबाई स्वाती सोनवणे (वय २८ ) यांची ७ फेब्रुवारी शनिवार रोजी मुंबई येथील केईएम रुग्णालयात प्रसूती झाली. दरम्यान झालेल्या अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे सकाळच्या सुमारास निधन झाले ; परंतु बाळ मात्र सुरक्षित आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अक्षय दिनकरराव सोनवणे यांचा दोन वर्षापुर्वी केकत निंभोरा येथिल स्वाती सोनवणे यांचेशी मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला होता. त्यांच्या संसार वेलीवर एक फुलसुद्धा उमलले परंतु नियतीला ते पहावले नाही. त्यांचा बाळंतपणाचा कार्यकाल पुर्ण होणे आधी सातव्या महिन्यात त्यांचेवर जळगाव येथील दवाखान्यात सिझेरियन झाल्यावर रक्तस्त्राव थांबत नसल्यामुळे मुंबई येथिल केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांना या मातेचा अंत झाला असुन बाळ मात्र सुखरूप आहे.

सदर सात महिन्याच्या बाळाला पोरकं करून आईने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वाती सोनवणे यांच्या पश्चात सात महिन्याचा मुलगा, पती, सासरा, सासु, जेठ व जेठाणी असा परिवार असुन त्यांच्यावर रविवार दि. ८ फेबुवारी रोजी सकाळी ८. ३० वाजता येथील स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add