Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शहरातील निवृत्त प्राध्यापकाच्या दारातून ‘टाटा नेक्सॉन’ लंपास!

जळगाव

शहरातील निवृत्त प्राध्यापकाच्या दारातून ‘टाटा नेक्सॉन’ लंपास!

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव – शहरातील गजबजलेल्या आयएमआर कॉलेज जवळील रामबाग कॉलनी परिसरातून ८ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप जगतसिंग पाटील (वय ६१, रा. प्लॉट नं ५, रामबाग कॉलनी, जळगाव) हे सेवानिवृत्त असून आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली टाटा नेक्सॉन कार (क्रमांक MH-19 DV-7790) घरासमोरील सार्वजनिक रोडवर नेहमीप्रमाणे पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता जेव्हा ते घराबाहेर आले, तेव्हा त्यांना आपली कार त्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही कार मिळून आली नसल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

चोरीला गेलेल्या कारची किंमत ८ लाख रुपये असून, त्यामध्ये महत्त्वाचे इंजिन आणि चेसिस क्रमांक देखील नमूद करण्यात आले आहेत. या घटनेमुळे उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या प्रोफेसर कॉलनी आणि रामबाग कॉलनी परिसरात खळबळ माजली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोहेकॉ मिलिंद सोनवणे करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add