Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन भक्तीभावात साजरा

जळगाव

श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन भक्तीभावात साजरा

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

‘जय गजानन’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

जळगाव प्रतिनिधी : शेगावचे श्री गजानन महाराज हे दत्तसंप्रदायातील महान संत व योगी म्हणून ओळखले जातात. सेवाभाव, भक्तिमार्ग आणि साधेपणाचा संदेश देणाऱ्या या अवलिया संतांचा प्रकटदिन काल (दि. ८ फेब्रुवारी) जळगाव शहरात मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. “गण गण गणात बोते” हा मंत्र जगाला देत कोणतेही अवडंबर न करता भक्तीनेच ईश्वरप्राप्ती शक्य आहे, हे श्री गजानन महाराजांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले.

या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील सप्तशृंगी कॉलनीतील सप्तशृंगी मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेसमोर सप्तशृंगी माता महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.11 जोडप्यांच्या हसते श्री गजानन महाराजांचे पूजन व आरतीने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.

प्रकटदिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. ‘जय गजानन’च्या जयघोषांनी आणि भक्तीमय वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

या सोहळ्याचे आयोजन सविताताई अरुण इंगळे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत पाटील, पवन पाटील, नामदेव घुगे, पंढरीनाथ पाटील, भूषण पाटील, सतीश राऊत, दीपक ढाकणे, निवृत्ती ब्राम्हणकर, गजानन सपकाळ सर, अरुण इंगळे, गोरख निकम, गजानन घुले, प्रमोद लोहार, मच्छिंद्र पाटील, गजानन विठोकार, अमोल कदम, शरद साटोटे, जानकीराम पाटील, तुषार फिरके, कैलास पाटील, विशाल कोकाटे, प्रतीक ब्राम्हणकर यांच्यासह सप्तशृंगी गणेश मित्र मंडळातर्फे मोलाचे सहकार्य लाभले .महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभलेल्या या कार्यक्रमात शिस्तबद्ध व भक्तीपूर्ण वातावरणात प्रकटदिन सोहळा उत्साहात पार पडला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add