Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण» राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले

राजकारण

 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

खोकल्याचा त्रास : रुबी रुग्णालयात उपचार सुरु

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तर, राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत. दरम्यान, आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले आहे.


शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत असल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रँट यांना तसे कळविण्यात आले आहे. डॉक्टर परवेझ ग्रँट तपासणीनंतर शरद पवारांना एडमिट करायचे की उपचार करून घरी पाठवायचे याबाबतचा पुढील निर्णय घेतील. शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासमवेत रुबी हॉस्पिटलमध्ये आहेत. दरम्यान,सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. ‘

रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवले जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ॲडमिट केले जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ, असे डॉक्टरांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add