Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»भुसावळ नगरपालिकेची पहिली जनरल मीटिंग 3 फेब्रुवारी रोजी पार पडली.

राजकारण

भुसावळ नगरपालिकेची पहिली जनरल मीटिंग 3 फेब्रुवारी रोजी पार पडली.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 11, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अल्पमतातील भुसावळ पालिकेची पहिली सभा गाजली

भुसावळ नगरपालिकेची पहिली जनरल मीटिंग 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. 50 नगरसेवकांच्या भुसावळ नगरपालिकेत भाजपचे 27 नगरसेवक असून शिवसेना 2 काँग्रेस 3 , अपक्ष 4 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 उमेदवार आहेत. गायत्री भंगाळे अध्यक्ष असलेल्या शरद पवार गटाचे बारा उमेदवार असून त्या अल्पमतातील नगराध्यक्षा आहेत. अल्पमतातील नगराध्यक्ष असलेल्या गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा पार पडली. त्यात एकूण 250 विषय विषय पत्रिकेवर होते. बाकी ऐनवेळी आयत्याचे दोन विषय आले. एकूण 250 पैकी 170 विषयांच्या संदर्भात वाद निर्माण झाले. म्हणजे भाजप तर्फे 170 विषयांना विरोध केला. या विषयांसंदर्भात एक तर मतदान घ्या किंवा मतदान घ्यायचे नसेल तर आमचा या विषयांना विरोध लिहून घ्या यावर नगराध्यक्षांनी आपल्या अधिकारात त्यांचे म्हणणे फेटाळून लावले आणि पुढे गेले.

बाकी 80 विषय जे होते ते सर्व संमतीने पार पडले. त्यात आयत्यावेळीचे विषय म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचे तैलचित्र सभागृहात लावण्या संदर्भातला होता आणि दुसरा आयत्याचा वेळेचा विषय संतोषी माता सभागृह जे शासनाने कोर्टामार्फत ताब्यात घेतले ते नगरपालिकेच्या सुपूर्द करण्यात यावे या दोन विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. एकंदरीत सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याचे स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी सांगितले. सांगायचे तात्पर्य म्हणजे पहिल्याच सभेत 250 विषय विषय पत्रिकेवर घेणे आणि एवढे विषय मंजूर करून घेणे म्हणजे तारेवरची कसरत म्हणावी लागेल. 170 विषयांना विरोधकांनी विरोध केल्याने त्यांचे म्हणणे फेटाळले असले तरी त्यांनी 170 विषयांना विरोध दर्शविला असून त्यांचा तो विरोध जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदविण्यात आला आहे. म्हणजे 170 विषय आता जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात गेल्याचे जिल्हाधिकारी याबाबतीत जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयानंतर आयुक्तांकडे दाद मागू शकतात. परंतु यामध्ये वेळेचा अपव्यय होऊन विकास कामांना खीळ बसतो एवढे मात्र निश्चित. भाजपचे 27 शिवसेनेचे 2 अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 असे महायुतीचे 31 सदस्य होतात. बहुमताचा आकडा महायुतीकडे असल्याने बहुसंख्य विषयांना महायुतीतर्फे अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. त्याप्रमाणे अल्पमतातील नगराध्यक्षांना विषय फेटाळण्याचे अधिकार असले तरी विषय विकास कामे प्रलंबित राहतील एवढे मात्र निश्चित..

चार वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दी नंतर पहिली लोकनियुक्त सदस्यांची मीटिंग पार पडली. त्यामुळे नगरपालिकेचे सभागृहच उपलब्ध नव्हते. घाई गर्दीने सभागृह तयार करून त्यात ही सभा घेण्यात आली. भुसावळ पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे या जरी असल्या तरी त्यांच्या वतीने नगरसेवक संतोष चौधरी हेच कामकाज पाहतात. सभा संपल्यानंतर गायत्री भंगाळे यांच्या वतीने पत्रकारांशी बोलताना संतोष चौधरी म्हणाले की, सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत एकूण 250 विषय विषय पत्रिकेवर होते. त्यातील 170 विषयांना विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला. विरोध दर्शवणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. त्याशिवाय लोकशाही जिवंत कशी राहील. त्यांनी विरोध दर्शविलेल्या विषयांना नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी आपल्या अधिकारात फेटाळून लावले. तो त्यांचा अधिकार आहे.

चार वर्षाचा प्रशासकीय राजवटीनंतर पहिली लोकनियुक्त सदस्यांची सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. भुसावळ शहराच्या विकासाला चालना आणायची आहे. ठराविक भागातील विकासाची कामे आम्ही करणार नाही, अगदी मोकळ्या मनाने शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर आमचा भर राहील. पहिलीच सभा असल्याने कोरमचा वगैरे प्रश्न आला नाही. कोरम साठी 17 नगरसेवकांची आवश्यकता असते. त्यासाठी सात जणांचा जो गट आहे, तो आम्हाला येऊन मिळणार असल्याचे समजते म्हणजे 12 + 7 असे 19 सदस्यांचा एक गट होईल. त्यामुळे 17 जणांचा कोरम झाला नाही तरी सभा पाच मिनिटांसाठी स्थगित करून पुन्हा घेता येते.

त्यामुळे भुसावळ पालिकेत 31 विरुद्ध 19 असे पक्षीय बलाबल राहील असे चित्र दिसते. तरीसुद्धा नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांना विषय पालिकेवरील विषय मंजूर करून घेण्यासाठी तारेवरची कसरत करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विकासाच्या कामे करण्यासाठी एकत्र येऊन करावी लागणार आहे. तरच विकास कामे होतील, अन्यथा विकास कामे होणार नाहीत. पहिल्या सभेवर नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या वतीने संतोष चौधरी यांचे वर्चस्व असलेले दिसून आले. संतोष चौधरी हे मुरलेले राजकारणी आहेत. ते फोडाफोडीचे राजकारण करून विकासाची कामे करून घेतील. पहिल्या सभेत विरोधक व सत्ताधारी खेळीमेळीच्या वातावरणात असले तरी मनमानी कारभार होऊ देणार नाही हेही तितकेच खरे..!

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add