Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»१९ जणांवर कारवाई : सीसीटीव्हीने उघड केली कॉपी;

ताज्या बातम्या

१९ जणांवर कारवाई : सीसीटीव्हीने उघड केली कॉपी;

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 11, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

कन्नड तालुक्यातील जेतपूर येथील परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण उघडकीस आणले आहे

जळगाव | छत्रपती संभाजीनगर शहरातील माध्यमिक शिक्षण विभागाने ‘कॉपीमुक्त’ अभियानांतर्गत मोठी धडक कारवाई करत कन्नड तालुक्यातील जेतपूर येथील परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण उघडकीस आणले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तब्बल १९ पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांविरुद्ध निलंबनासह कठोर कारवाई करण्यात आली असून, शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (दि. १० फेब्रुवारी) इयत्ता १२ वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जेतपूर येथील केंद्रावर काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहत तसेच उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींचा वापर करत असल्याची तक्रार प्राप्त झाली. भरारी पथकाने तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, पर्यवेक्षकांच्या उपस्थितीतच गैरप्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या संबंधित पर्यवेक्षक आणि बैठे पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. खासगी संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर त्यांच्या संस्थेमार्फत शिस्तभंग व कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

परीक्षेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी संबंधित केंद्रावरील केंद्र संचालकांसह १९ जणांचा ताफा तात्काळ बदलण्यात आला असून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे. कॉपी पुरवणाऱ्यांसह त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे संकेतही या घटनेतून मिळत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add