Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल!

राजकारण

मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल!

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा

जळगाव प्रतिनिधी – मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध बुधवारी सायंकाळी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी सावदा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर खडसे यांनी त्यांना बोलावून घेतले.

यावेळी त्यांनी तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब विचारत मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. तसेच तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत, असे म्हणत अपमानास्पद शब्द वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी याबाबत २९ जानेवारी २०२६ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी भातेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याची माहिती त्यांना दिली. मात्र, तपास सुरू असल्याने कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने खडसे अधिकच संतप्त झाले.

त्यांनी आगामी अधिवेशनात बघून घेतो, अॅन्टी करप्शनचा ट्रॅप लावतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने मंत्र्यांविरोधात अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेबाबत सहायक पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत आमदार खडसे यांच्याविरुद्ध दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add