Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बसला हिरवा झेंडा

जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बसला हिरवा झेंडा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना

जळगाव तालुक्यातील कृषी विभाग व उमेद अभियानांतर्गत महिला व पुरुष शेतकरी पाणी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ निवासी प्रशिक्षणासाठी के.व्ही.के. जळगाव जामोद सेंटर, जिल्हा बुलडाणा येथे रवाना झाले. या प्रशिक्षणाचा उद्देश शेतकऱ्यांना जलसंधारण, शाश्वत शेती पद्धती व ग्रामविकास विषयक मार्गदर्शन करणे हा आहे.

या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर (DRDA) राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती देसले, कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, बीडीओ चंद्रकांत बोडरे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक देवेंद्र सुर्यवंशी तसेच पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद आरसुळे, उपविभागीय समन्वयक सुहास मोहिते, प्रियंका बैसाणे व तेजस निकुंभ आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत फार्मर कप प्रशिक्षणात जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. त्यांनी जलसंवर्धन व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add