Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»हजारो सेविका-मदतनीसांचा आंदोलनात सहभाग ; देशव्यापी संपाला जळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

हजारो सेविका-मदतनीसांचा आंदोलनात सहभाग ; देशव्यापी संपाला जळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

देशव्यापी लाक्षणिक संपाला जळगाव जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला.

जळगाव । केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितांविरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपाला जळगाव जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे ७ हजार ८०० अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी संपात सहभागी होत जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाचे लक्ष वेधले. श्रम संहिता कामगारविरोधी असून त्या रद्द कराव्यात, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. दरम्यान यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास हेमंत भदाणे यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले सदर निवेदन शिफारशी सह शासनाला पाठविण्याची विनंती केली.आंदोलन यशस्वी करण्यासाठी मिनाक्षी चौधरी,मंगला नेवे,सविता महाजन,चेतना गवळी,रेखा नेरकर,सुनंदा नेरकर,पुष्पा परदेशी,शोभा जावरे,आशा जाधव, संगीता निंभोरे,नंदा देवरे,प्रतिभा पाटील,निता सुरवाडे,सलमा तडवी,कल्पना जोशी,शकुंतला चौधरी, रेखा गवारे आदींनी प्रयत्न केले.

या आहेत प्रमुख मागण्या?
1) केंद्र सरकारने आणलेले कामगार/कर्मचारी विरोधी कायदे रद्द करावेत.
2) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत.
3) मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅच्युटी लागू करावी.
4) गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविकांना 24800/- रुपये आणि मदतनीसांना 20400/- रुपये वेतन लागू करावे.
5) अंगणवाडी सेविका मदतनिसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता तो मानधनात वर्ग करून सरसकट लागू करण्यात यावा.


6) योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रधान करून दरमहा पेन्शन लागू करण्यात यावे.
7) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तातडीने अदा करावा.
8) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासह अन्य योजनबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नयेत.
9) अंगणवाडी सेविका मदतनीसांना दरवर्षी पंधरा दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.
10) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची भरपगारी रजा लागू करावी.
11) FRS करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात.
12) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकरच्या कामाचा विचार करून 5 जी मोबाईल देऊन दरवर्षी 3600 /- रुपये मोबाईल रिचार्जसाठी देण्यात यावेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add