Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, तीन घरे जळून खाक; शिरसाठ कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त

ताज्या बातम्या

घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, तीन घरे जळून खाक; शिरसाठ कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णतः जळून खाक

जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या कुढापा चौक परिसरात रविवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत पीडित कुटुंबांचा संसार अक्षरशः भस्मसात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुढापा चौक परिसरात निलेश शंकर शिरसाठ आणि बापू शंकर शिरसाठ यांची घरे आहेत. रविवारी सकाळी अचानक त्यांच्या घरात आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार प्रथम शॉर्टसर्किट झाले असून त्यानंतर गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आगीच्या ज्वाळांनी आजूबाजूच्या घरांनाही वेढा घातला.

लाकडी पार्टिशनचे घर असल्यामुळे आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले. या आगीत घरातील फर्निचर, कपडे, रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. डोळ्यादेखत संसार राखेत बदलल्याचे पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र आग आटोक्याबाहेर गेली होती. घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिका अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते आणि आगीचे तीव्र स्वरूप यामुळे अग्निशमन जवानांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add