Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई !

ताज्या बातम्या

सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली

एटीएसने राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसचे सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. जवळपास २१ ठिकाणी एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या कारवाईत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान या कारवाईने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएसने छापेमारी केली. मध्यरात्री एटीएसने ही छापेमारी केली. गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखल्या जातो. गेल्या दोन ते तीन वर्षात औरंगजेबाचं उद्दातीकरणाचा प्रयत्न असो वा पाकिस्तानच्या घोषणा असो अहिल्यानगर हे चर्चेत आले आहे. यापूर्वी अहिल्यानगरमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या तरुणांची माथी भडकवण्याचे प्रयत्न पण समोर आले होते. त्यानंतर आता एटीएसच्या छापेमारीने पुन्हा एकदा हा भाग चर्चेत आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add