Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शेतकरी कृषिमाफीची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर होणार घोषणा?

जळगाव

शेतकरी कृषिमाफीची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर होणार घोषणा?

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत असून अशातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे.

जळगाव । गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत असून अशातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकार लवकरच कर्जमाफीची घोषणा करणार असून, येत्या ३० जूनपूर्वी याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्यातील कर्जमाफीच्या नव्या निर्णयामुळे सुमारे २४ ते २५ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी कशाप्रद्धतीने लागू करावी, यासाठी सरकारकडून प्रविण परदेशी समिती स्थापन करण्यात आली होती. आम्हाला तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातला रिपोर्ट येईल. तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही चर्चा करून 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ, असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकरी आणि इतर थकीत कर्जदारांना या निर्णयाचा लाभ होईल. राज्यातील कर्जमाफीच्या नव्या निर्णयामुळे सुमारे २४ ते २५ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या शेतकऱ्यांचे एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांचे पीककर्ज थकीत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कर्जमाफीचा आराखडा अंतिम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि बाजारभावातील चढउतार यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेली पीककर्जे थकली आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add