Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»१७ फेब्रुवारीला शहरभर प्रतीकात्मक सफाई कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

१७ फेब्रुवारीला शहरभर प्रतीकात्मक सफाई कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 16, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

यावल नगरपरिषद कार्यालयासमोर १० फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू

यावल प्रतिनिधी :  शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी आता आपल्या हक्कांसाठी थेट लढाईचा मार्ग स्वीकारला आहे. यावल नगरपरिषद कार्यालयासमोर १० फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत उपोषण सुरू असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.हे आंदोलन अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन सुरेश बिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कर्मचाऱ्यांनी उपोषण छेडले आहे.


काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या? संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात खालील मुद्दे ठळकपणे मांडले आहेत:किमान वेतनाचा तात्काळ लाभ पीएफ, ग्रॅच्युइटी व इतर कायदेशीर सुविधा नियमित व वेळेवर पगार सुरक्षा साधने व आवश्यक कामाचे साहित्य संबंधित ठेकेदारावर कारवाई व ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, ठेकेदार दिशा एजन्सी यांना दरमहा सुमारे १५ लाख रुपयांचे बिल दिले जात असताना कामगारांना त्यांच्या हक्कांच्या सुविधा दिल्या जात नाहीत. प्रशासन व ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


१७ फेब्रुवारीला ‘भिकमागो’ आणि कचराफेक आंदोलन उपोषणाला प्रतिसाद न मिळाल्यास १७ फेब्रुवारी रोजी शहरभर ‘भिकमागो आंदोलन’ करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात कर्मचारी प्रतीकात्मकरीत्या भिक मागण्याचा उपक्रम राबवतील. तसेच नगरपरिषद कार्यालयासमोर कचरा फेकून निषेध व्यक्त करण्याची तयारी सुरू आहे.
संघटनेने या संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित विभागांना पाठवले असून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


आंदोलनाचे नेतृत्व आणि भूमिका
स्थानिक पातळीवर या आंदोलनाचे नेतृत्व विनोद देवराम बारसे करत असून अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सह्या करून पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष नागेज मोहन कंडारे व राज्य कार्याध्यक्ष डॉ. रेखाताई गोपाल पहनवाल यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू असल्याचे सांगण्यात आले.


प्रशासन काय भूमिका घेणार?
शहराची स्वच्छता राखणारे कर्मचारीच उपोषणावर असल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने तात्काळ चर्चा करून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा प्रश्न आता केवळ वेतनापुरता मर्यादित नसून तो सन्मान आणि सुरक्षिततेचाही बनला आहे. १७ फेब्रुवारीला परिस्थिती कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add