Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»फार्मसीच्या विद्यार्थ्याने संपविले जीवन; सुसाईड नोटमध्ये प्राचार्यावर गंभीर आरोप

जळगाव

फार्मसीच्या विद्यार्थ्याने संपविले जीवन; सुसाईड नोटमध्ये प्राचार्यावर गंभीर आरोप

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 17, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव येथील शिरसोली रस्त्यावर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी मधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने नेहरू नगर येथील खोलीत गळफास

जळगाव । जळगाव येथील शिरसोली रस्त्यावर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी मधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने नेहरू नगर येथील खोलीत गळ#$फास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. श्याम प्रभाकर पाटील (वय १९, रा.बोदवड ता. मुक्ताईनगर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून घटनास्थळी त्याच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यात त्याने आपल्या मृत्यूला महाविद्यालयाचे प्राचार्य यांना जबाबदार धरले आहे.

श्याम पाटील हा गेल्या दोन वर्षापासून गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, रविवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेनंतर त्याने जळगाव शहरातील नेहरू नगर येथे त्याच्या रूमवर गळ#$फास लावून आत्म#$हत्या केली. त्याच्यासोबत खोलीत राहत असलेला मित्र सुट्टी निमित्त गावाला निघून गेल्यामुळे रूमवर एकटाच असलेल्या श्याम याने नैराश्यातून गळ#$फास लावून घेतला.

घटनास्थळी त्याच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, “माझी कोणतीही चुकी नसताना प्राचार्य योगेश पवार यांनी मला सर्व शिक्षक स्टाफ आणि मित्रांसमोर अपमानित करून मारहाण केली. मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलो असताना, समोरचा मुलगा मुले घेऊन आला तरी प्राचार्यांनी त्याला काहीच म्हटले नाही. उलट मलाच पीव्हीसी पाईपने मारले आणि शिवीगाळ केली. गुरु मारतात हे माहीत आहे, पण इतके नाही मारत.” पत्राच्या शेवटी त्याने आपल्या मित्राला उद्देशून, “रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाक,” असे भावपूर्ण आवाहनही केले आहे.

दरम्यान, संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. महाविद्यालयातील छळामुळे एका हुशार विद्यार्थ्याला जीव गमवावा लागल्याने विद्यार्थी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुसाईड नोट जप्त केली आहे. सध्या रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात असून पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add