मुक्ताईनगर तालुक्यातील धामणदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत 2020-21 ते 2024-25 अखेर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील धामणदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत 2020-21 ते 2024-25 अखेर कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. या प्रकरणाची एक महिन्याच्या आत सखोल चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत सदस्य शशिकांत शिंदे, सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गोरे यांनी कामांच्या मंजुरी प्रक्रियेत आढळलेल्या गंभीर त्रुटींवर सविस्तर माहिती देत सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले.मंत्री…
Author: Editorial Desk
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय चा वापर करत व्हॉटसअप चॅटबॉटची निर्मिती केली आहे. जळगाव । पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय चा वापर करत व्हॉटसअप चॅटबॉटची निर्मिती केली आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून पाचोरा नगरपालिकेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती तसेच तक्रार निवारण बाबतची माहिती नागरिकांपर्यंत व्हाट्सॲपवर पाठविण्यात येणार आहे. या अत्याधुनिक चॅटबॉटचे लोकार्पण आज नगराध्यक्षा सूनिताताई किशोरआप्पा पाटील व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. पाचोरा नगरपालिकेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेता सुमीत किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेता सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, सभापती प्रवीण ब्राह्मणे, सभापती रेहमान तडवी, सभापती प्रियांका पाटील, सभापती मीनाक्षी…
पहाटे मोठी संयुक्त कारवाई करत अवैध वाहतुकीला जबर दणका दिला. जळगाव । चोरट्या वाळू वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी व परिसरात पहाटे मोठी संयुक्त कारवाई करत अवैध वाहतुकीला जबर दणका दिला. या मोहिमेत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर जप्त करण्यात आले आहे. जप्त वाहने पोलिस मुख्यालय परिसरात लावण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला असून अनेकवेळा कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यावर हल्ले करण्यात आल्याच्या घटना दिसून आल्या आहे. दरम्यान, गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कारवाई हाती…
काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक पाळधी जवळ उलटून एकेरी वाहतूक सुरु झाल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. जळगाव । जळगाव–पाळधी बायपासवर विचित्र अपघात घडला. काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक पाळधी जवळ उलटून एकेरी वाहतूक सुरु झाल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाळधीहून भुसावळकडे काचेच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक भोकनी फाट्याजवळ अचानक उलटला. वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली असताना भरधाव ट्रकने चार ते पाच वाहनांना धडक दिली. दोन्ही बाजूने अपघात झाल्याने…
‘हो’ म्हणून दिलेला शब्दच माझ्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट ठरला,” जळगाव प्रतिनिधी । “माझ्या वडिलांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवशील का, असा प्रश्न विचारला आणि मी ‘हो’ म्हणून दिलेला शब्दच माझ्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट ठरला,” असे भावनिक प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे सन २०२० बॅचचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. मंदाकिनी आमटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत…
जळगाव शाखेने हा मानाचा किताब पटकावला असून सीए हितेश आगीवाल यांच्या नेतृत्वाला यशाची पावती मिळाली आहे. जळगाव प्रतिनिधी । येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या सीए शाखेला पश्चिम भारत क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट शाखा म्हणून “प्रथम” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वर्ष २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध व्यावसायिक व समाजाभिमुख उपक्रमांच्या जोरावर जळगाव शाखेने हा मानाचा किताब पटकावला असून सीए हितेश आगीवाल यांच्या नेतृत्वाला यशाची पावती मिळाली आहे. मुंबई येथे मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या ७६ व्या भव्य वार्षिक सोहळ्यात पश्चिम भारत क्षेत्रीय मंडळ (महाराष्ट्र, गुजरात व गोवा) यांच्या वतीने जळगाव सीए शाखेचा गौरव करण्यात…
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, जळगाव प्रतिनिधी | ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी तसेच कापणी, मळणी, आंतरमशागत आदी शेतीकामे सुलभपणे पार पडावीत, यासाठी शेतरस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक असल्याने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . या प्रशिक्षणात शासन निर्णयातील विविध तरतुदींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक…
जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा जळगाव । जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यात येऊनही शिक्षण विभागाकडून मात्र कॉफीची कारवाई निरंक दाखवण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे खुलासा मागवण्यात आला असून खुलासानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक…
जयश्री राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या उद्देशाने कामांचा शुभारंभ जळगाव शहरातील प्रभाग क्र. ९ च्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या उद्देशाने कामांचा शुभारंभ सुरु केला आहे. आज त्यांनी देवराम नगर परिसरातील मुख्य गटारीची पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रभागातील अनेक गटारी तुंबल्या असल्यामुळे नागरिकांना घरात आणि रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. नगरसेविकेच्या निर्देशानुसार मनपा आरोग्य विभागाने ताबडतोब जेसीबीद्वारे गटारी साफ करण्याचे काम सुरू केले. जयश्री पाटील यांनी या दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आगामी दिवसांत प्रभागातील सर्व तुंबलेल्या गटारी लवकरात लवकर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की,…
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर होळीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर होळीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. भोंगऱ्या बाजाराची धूम सुरु झाली आहे. खान्देशात मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होतो. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये होळीच्या उत्सवाची रंगत चढू लागली असून पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा स्वर पुन्हा एकदा दऱ्याखोऱ्यांत घुमू लागला आहे. खान्देशातील आदिवासी समाजासाठी विशेष महत्त्व असलेला हा उत्सव उत्साह, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचे प्रतीक मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भोंगऱ्या बाजाराची सुरुवात झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये होळी म्हणजे केवळ रंगांचा सण नसून सांस्कृतिक परंपरांचा महोत्सव असतो. आदिवासी…

