Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»पश्चिम भारतात ‘प्रथम’ जळगाव सीए शाखेला मानाचा तुरा

जळगाव

पश्चिम भारतात ‘प्रथम’ जळगाव सीए शाखेला मानाचा तुरा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 28, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव शाखेने हा मानाचा किताब पटकावला असून सीए हितेश आगीवाल यांच्या नेतृत्वाला यशाची पावती मिळाली आहे.

जळगाव प्रतिनिधी । येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या सीए शाखेला पश्चिम भारत क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट शाखा म्हणून “प्रथम” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वर्ष २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध व्यावसायिक व समाजाभिमुख उपक्रमांच्या जोरावर जळगाव शाखेने हा मानाचा किताब पटकावला असून सीए हितेश आगीवाल यांच्या नेतृत्वाला यशाची पावती मिळाली आहे.

मुंबई येथे मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या ७६ व्या भव्य वार्षिक सोहळ्यात पश्चिम भारत क्षेत्रीय मंडळ (महाराष्ट्र, गुजरात व गोवा) यांच्या वतीने जळगाव सीए शाखेचा गौरव करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सीए केतन सैया यांच्या हस्ते जळगाव शाखेचे अध्यक्ष सीए हितेश आगीवाल, उपाध्यक्ष सीए रोशन रुणवाल आणि सचिव सीए सोहन नेहेते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे आणि बाहेरगावी स्थलांतर कमी करणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे सीए हितेश आगीवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

देशाची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याच्या ध्येयात सीए क्षेत्राचे मोठे योगदान असणार असून भविष्यात ३० लाख सीए देशसेवेत उभे करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

इयत्ता सातवीपासूनच सीए अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नव्या आयकर कायद्याबाबत मार्गदर्शन, तसेच सूक्ष्म व लघुउद्योजकांसाठी “MSME क्लिनिक”च्या माध्यमातून मोफत सल्ला देण्याचा उपक्रमही शाखेकडून राबविण्यात येणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add