Author: Editorial Desk

करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जळगाव । राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, शासकीय कामकाजात AI व Block Chain चा वापर तसेच GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अशा एकूण सात सर्वंकष निकषांवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आलेल्या या निकालात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव याची राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील…

Read More

मुळे भुसावळ-बडनेरा मेमूसह अनेक गाड्या रद्द अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल जळगाव – भुसावळ-बडनेरा रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे विशेष ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे ३० जानेवारी रोजी भुसावळ-बडनेरा मार्गावरील मेमूसह काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन (वेळ बदलणे) करण्यात येणार आहे. ​रद्द करण्यात आलेल्या गाड्या ​जलंब स्थानकावरील कामामुळे प्रवाशांची मोठी गर्दी असलेल्या खालील गाड्या रद्द राहतील:६११०१/६११०२ भुसावळ-बडनेरा-भुसावळ मेमू. , १११२१/१११२२ भुसावळ-वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस. , ०१२११ बडनेरा-नाशिक रोड विशेष ट्रेन (३० जानेवारी). ,०१२१२ नाशिक रोड-बडनेरा विशेष ट्रेन (२९ जानेवारी). ​या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल​ब्लॉकच्या कालावधीत काही…

Read More

बनावट फोटो-व्हिडिओंमुळे अनेक घटक नाहक बदनाम” एआयचा गैरवापर की सामाजिक संकट ? विश्वाने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली याचा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. याशिवाय सर्वजण गर्वाने म्हणतात की आम्ही तंत्रज्ञानी आहोत. जगाने पावलोपावली प्रगती केली असली तरी सध्या सर्वत्र संपूर्ण विश्वाला अचंबित करणारा एआय अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. कहर म्हणजे या एआयने क्षणार्धात अनेक फोटो, व्हिडिओ तयार करून संभ्रमात टाकणाऱ्या स्थिती निर्माण केल्या आहेत. यातून मनुष्याला नेमके काय करावे आणि काय करू नये अशा द्विधा मनस्थितीत सापडला आहे.प्रत्येक वेळी तंत्रज्ञान जागतिक पातळीवर प्रगती करतांना आपण बघतोय आधुनिकतेत तंत्रज्ञानाचा वाढता आलेख निश्चितच सुखदायक आणि प्रेरणादायी आहे.…

Read More

एकनाथ शिंदेंचं मोठं विधान…! लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढणार ? राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी, पण तितकीच उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या मिळणाऱ्या 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपये होणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महायुती सरकार सत्तेत येऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला, तरी सन्मान निधीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर लाडक्या बहिणींच्या अपेक्षा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…. “1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार, हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे आणि तो आम्ही नक्की…

Read More

बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळला मंत्री गिरीश महाजनांना महिला पोलिसांनी विचारला थेट जाब ! नाशिक येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात मोठा वाद निर्माण झाला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याने संतप्त झालेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याने थेट व्यासपीठाजवळच त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे शिल्पकार मानले…

Read More

गुलाबराव पाटलांची खोचक फटकेबाजी ! जळगाव जिल्ह्यातील मोठे औद्योगिक प्रकल्प शेजारच्या तालुक्यांकडे वळत असल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत स्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांवर शालजोडीतील शब्दांत टोलेबाजी केली. “कोकाकोला प्रकल्प जामनेरला गेला, आता १५ हजार कोटींचा प्रकल्प चाळीसगावला गेला. मग आम्ही फक्त बघत बसायचं का? आपण आमदार आहोत की नाही? भानगड केल्याशिवाय काहीच मिळत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली. जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला. “बहुतेक पुढच्या वेळी मलाही ‘कोट’ घालून दावोसला जावं लागेल,…

Read More

जळगावच्या पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार यांना राष्ट्रपती पोलीस पदक जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना २०२६ सालचे प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि निष्कलंक सेवेचा हा सन्मान मानला जात आहे. पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे आदर्श उदाहरण म्हणून संजय शेलार यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या सेवाकाळात तब्बल ३५ वर्षे अखंडपणे कर्तव्य बजावले असून, या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २४२ बक्षिसे मिळाली आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण सेवाकाळात त्यांना एकदाही शिक्षा, दंड अथवा ताकीद देण्यात आलेली नाही.…

Read More

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ मध्ये ग्राहक बनून सोन्याची चेन लंपास करणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या सोन्यापासून बनवलेली सोन्याची लगड देखील हस्तगत केली असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सुभाष चौकातील नयनतारा अँड सन्स (आर.सी. बाफना ज्वेलर्स) मध्ये एक अज्ञात इसम सोन्याची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने सेल्समनला बोलण्यात गुंतवून १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन २ लाख ४९ हजार अत्यंत शिताफीने चोरून नेली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read More

वासुदेवाच्या प्रबोधनात्मक संगीताने दुमदुमले जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील अविभाज्य घटक असलेला ‘वासुदेव’. पारंपारिक वेशभूषा केलेल्या वासुदेवाने आपल्या प्रबोधनात्मक संगीताच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. सांगीतिक प्रबोधनाने वेधले लक्ष : “वासुदेव आला हो वासुदेव आला…” या लोकप्रिय आणि प्रबोधनात्मक संगीताच्या सुरावर वासुदेवाने मतदानाविषयी जनजागृती केली. केवळ भाषणे किंवा फलकबाजी न करता, लोककलेचा वापर करून मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश थेट लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यात आला. यावेळी वासुदेवाने आपल्या सादरीकरणातून “प्रत्येक मत मौल्यवान आहे” आणि “लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे”,…

Read More

ई-केवायसीतील चुकांमुळे लाभ थांबला; अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू होणार जळगाव प्रतिनिधी : राज्य शासनाच्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेदहा लाखांहून अधिक महिला पात्र असताना डिसेंबर महिन्यात तब्बल १ लाख ८ हजार ९६ महिलांना मासिक हप्ता मिळाला नसल्याचे समोर आले आहे. अचानक लाभ थांबल्याने जिल्हाभरात महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, या लाभार्थ्यांचा हप्ता थांबण्यामागे ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुका कारणीभूत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र, नंतर शासनाने उत्पन्न मर्यादा, घरात चारचाकी वाहन असणे आदी अटी लागू केल्याने काही महिलांचे नाव…

Read More