या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल जळगाव : शेअर ट्रेडिंगविषयी इंटरनेटवर माहिती शोधताना अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडलेल्या एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारी नगर परिसरात राहणारे आणि खासगी कंपनीतून निवृत्त झालेले ६१ वर्षीय व्यक्तीने ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन शेअर ट्रेडिंगची माहिती शोधली. यावेळी दिसलेल्या एका व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक केल्यानंतर ते एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपमध्ये शेअर बाजारासंबंधी माहिती देत गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. ग्रुपमधून पाठविण्यात आलेल्या लिंकवरून…
Author: Editorial Desk
श्रद्धांजली अर्पण करत पाचोरा बंद; पाचोरा | प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजुन ४६ मिनिटांनी विमान अपघातात दुःखद निधन झाले. ही घटना काळजाला चटका लावून जाणारी ठरली. स्व. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी बांधव यांचे वतीने २९ जानेवारी रोजी सकाळपासुनच अत्यावश्यक सेवा वगळता पाचोरा शहर दुपारी १२ वाजेपर्यंत शांततेत बंद ठेवण्यात आले होते. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आ. किशोर पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा…
आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चोपडा : तालुक्यातील उमर्टी गावात बुधवारी सकाळी एक अत्यंत काळजाला चटका लावणारी घटना उघडकीस आली. एका २८ वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह आणि केवळ १५ दिवसांच्या नवजात बाळासह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मयत महिलेचे नाव पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८) असे असून, तिचा मोठा मुलगा विरेन (वय अडीच वर्षे) व १५ दिवसांचे नवजात बाळ अशा तिघांचे मृतदेह बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. मंगळवारपासून पमिता ही दोन्ही मुलांसह बेपत्ता असल्याची नोंद होती. पमिता काही दिवसांपूर्वीच बाळंत झाली होती. प्रसूतीनंतर विश्रांतीसाठी ती माहेरी आली होती. मात्र दोन-तीन…
अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर – येथील जामनेर पोलीस ठाण्यात विवाहित महिलेवर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ३४/२०२६ नुसार भारतीय दंड विधान कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही नोंद २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०२ वाजता करण्यात आली आहे.फिर्यादी महिला (वय ३६, व्यवसाय – घरकाम) रा. लोहारा, ता. पाचोरा (सध्या रा. सावरला, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ४ ऑक्टोबर २०२५ पासून वेळोवेळी आरोपींनी संगनमताने त्यांना शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच…
अखेरच्या प्रवासाला सुरुवात ! राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी काटेवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले असून, कुटुंबीय, पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. अंत्यदर्शनानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारांना संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील बारामतीत दाखल होणार आहेत. बारामती येथे बुधवारी सकाळी ८.४६ वाजता झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६ वर्षे ६ महिने ६ दिवस) यांचे दुर्दैवी निधन झाले. या अपघातात वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी…
थंडी वाढणार का? जळगाव । जळगावसह महाराष्ट्राच्या हवामानात गेले काही दिवसांपासून होत असलेल्या चढ उतारामुळे थंडीचा कडाका कमी झाला. ढगाळ वातावरमुळे तापमानाचा पारा वाढला आहे. बुधवारी जळगावचे किमान तापमान १४.८ अंशावर तर कमाल तापमान ३१.५ अंशावर पोहोचला. दरम्यान जिल्ह्यात पाऊस किंवा वादळाची शक्यता पूर्णपणे मावळली असून हवामान कोरडे राहील. दोन दिवसापूर्वी जळगावात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून यामध्ये शेती पिकांचे मोठं नुकसान झाले. यानंतर काल हवामान स्वच्छ दिसून आले. जळगावचे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे थंडीचा जोर ओसरला असून उकाडा जाणवत आहे. दरम्यान जळगावमध्ये पुढील तीन दिवसांत तापमानात चढ-उतार होऊन किमान तापमान १४ ते १५ अंश राहील, ज्यामुळे…
‘वाघा’ला निरोप देण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून अखेरचा निरोप दिला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. बारामतीचा कायापालट पाहण्यासाठी याआधी अनेकदा उत्साहात आलेले अमित शहा आज मात्र अत्यंत जड अंतःकरणाने बारामतीत दाखल झाले. अजित पवार हे केवळ राज्याचे नेते नव्हते, तर सहकार क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान आणि थेट संवाद साधण्याची हातोटी ही राष्ट्रीय पातळीवरही कौतुकाचा विषय होती.…
भुसावळ येथील दोन अल्पवयीन मुलींच्या झालेल्या निर्घृण भुसावळ : साक्री ता. भुसावळ येथील दोन अल्पवयीन मुलींच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना( शिंदे गट ) महिला जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व याप्रसंगी सौ.नंदाताई निकम यांनी सदर हत्याकांडास जबाबदार असलेल्या आरोपींना लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यासाठी शासन दरबारी शक्य तितका पाठपुरावा करून पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. संशयित हा अल्पवयीन असला तरी त्याने केलेले कृत्य हे खुना चे असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा म्हणजेच फाशी ची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली . या प्रसंगी शिवसेना माजी…
एसीबीच्या सापळा कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ एरंडोल प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८/२०२६ दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल…
पालकमंत्री गुलाबराव पाटलांची भावपूर्ण श्रद्धांजली जळगाव । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात की,अजितदादा पवार यांचे निधन ही अत्यंत धक्कादायक, वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. वक्तशीरपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची मजबूत पकड यासाठी ते ओळखले जात होते. सभागृहातील शिस्तबद्ध वर्तन, सर्वसामान्यांबद्दलची आपुलकी आणि राज्याच्या विकासासाठी असलेली तळमळ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव होता. विरोधकांनाही आदराने वागवणारे अशी ओळख असलेले अजितदादा हे बारामतीचे किल्लेदार म्हणून केवळ आपल्या…

