दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेल्या श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री ओंकारेश्वर मंदिराचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा आज ३१ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी आणि पूजन कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून जोशी परिवाराच्या हस्ते मंदिरात विधीवत धार्मिक अनुष्ठाने पार पडली. यामध्ये पुण्याहवाचन, घंटापूजन, दीपक पूजन व शंखपूजन करण्यात आले. यासोबतच गणेश-अंबिका पूजन, द्वारपूजन व वास्तुपूजन करून मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात…
Author: Editorial Desk
श्रद्धांजली कार्यक्रम छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात घेण्यात येईल. जळगाव | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी आकस्मिक निधनामुळे राज्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.अजितदादा पवार यांचे राजकीय,सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा अशा विविधांगी क्षेत्रातील काम लक्षात घेता सर्वपक्षीय आणि जिल्ह्यातील अखिल सर्वसमावेशक संस्था तसेच संघटनांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली सभेचे येत्या रविवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक २ वाजता आयोजन करण्यात आले आहे.श्रद्धांजली कार्यक्रम छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात घेण्यात येईल. आज शुक्रवार (३० जानेवारी) रोजी याबाबत पूर्वतयारीची बैठक जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जिल्हा बँकेच्या सभागृहात ही बैठक…
साधेपणाने पार पडणार शपथविधी सोहळा मुंबई विशेष प्रतिनिधी : अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड उद्या, शनिवारी करण्यात येणार आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतील, हे आता स्पष्ट झाले असून उद्याच त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे समजते. नेतेपदी निवडीसाठी आमदारांची बैठकराष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विशेष बैठक उद्या शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षनेतेपदी एकमताने निवड केली जाईल. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत निवडीचे पत्र सोपवले जाईल. लगेचच सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत अजितदादा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली मुक्ताईनगर प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघातात निधन झाल्याने मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत अजितदादा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. बुधवारी प्रवासादरम्यान झालेल्या विमान अपघातात अजितदादांचे निधन झाल्याची वार्ता समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी मुक्ताईनगर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा आणि बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या होत्या. प्रवर्तन चौकात शोकसभा गुरूवार दुपारी १२ वाजता प्रवर्तन चौकात शोकाकुल वातावरणात…
१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला मुंबई-वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेला तीन दिवसांचा शासकीय दुखवटा विचारात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, आता ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी १३ जानेवारी २०२६ रोजी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेणे आणि चिन्हांचे वाटप…
दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीत तफावत ; जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहिमेत जळगाव जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग टक्केवारीत तफावत आढळून आल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या आणखी सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १९ वर पोहोचली आहे. राज्यातील दिव्यांग कर्मचारी तसेच दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत UID कार्ड तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू आहे. तपासणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारी शासनाने निश्चित केलेल्या…
आ. अमोल जावळे यांचे अवकाळी वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनाम्याचे आदेश. यावल प्रतिनिधी : दि.२८ रावेर व यावल तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी वादळी पावसाने आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. जोरदार वादळासह झालेल्या गारांच्या माऱ्यानंतर आलेल्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या तडाख्याने हिरावून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असून ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. गारपिटीमुळे केळी, गहू, हरभरा, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांची पत्रे उडून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीर दखल…
रेल्वे प्रवास करण्याआधीच तपासून घ्या जळगाव । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी असून भारतीय रेल्वेकडून ट्रेनच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला आहे. या ट्रेन्सच्या वेळात कधी अन् किती बदल झालाय, हे रेल्वेने प्रवास करण्याआधी तपासून घ्या. अन्यथा रेल्वे स्थानकावर गेल्यावर ताटकळत बसावे लागेल. रेल्वेने जारी केलेले हे नवे वेळापत्रक शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. तर काही ट्रेन्सच्या वेळापत्रकात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बदल होणार आहे. या १२ ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल करण्याचा कारण ऑपरेशनल सुधारणा आहेच. पण त्याशिवाय रूळाची देखभाल आणि ट्रेनच्या वेळेवर नियंत्रण सुधारण्यासाठी करण्यात आल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगतले. कोणत्या १२ ट्रेन्सच्या वेळात बदल होणार –५४०२० रोहतक जंक्शन-रेवाडी जंक्शन…
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जळगाव। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 02 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष रेल्वेला मुदतवाढ जळगाव । शिर्डीवाले साईबाबा आणि खाटुश्याम दर्शनाला जाणाऱ्या प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे सेवा एक मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक 04716 साईनगर शिर्डी – बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी अधिसूचित 1 फेब्रुवारीपर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित करण्यात आली. मात्र ही गाडी आता 1 मार्चपर्यंत धावणार आहे. तर गाडी क्रमांक 04715 बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी अधिसूचित 31 जानेवारीपर्यंत धावणार होती मात्र ती आता 28 फेब्रुवारीपर्यंत धावेल. या स्थानकांवर…

