माहितीचा अधिकार (RTI) अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला नऊ जणांनी मिळून बेदम मारहाण पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे माहितीचा अधिकार (RTI) अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला नऊ जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भागवत बंडू पाटील (वय ४५) असे जखमी फिर्यादीचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ३१ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मंदिराजवळ घडली. फिर्यादी पाटील मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर येत असताना, आरोपी अमोल बाविस्कर आणि त्याच्या इतर आठ साथीदारांनी त्यांना अडवले. “तू माहितीचा अधिकार मागे…
Author: Editorial Desk
अत्रावल परिसरात भरलेल्या मुंजोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र आणि पोत लंपास केल्याची घटना घडली यावल प्रतिनिधी – यावल येथील अत्रावल परिसरात भरलेल्या मुंजोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र आणि पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, फिर्यादी मंदाकिनी मुकेश गजरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार महिला यात्रेसाठी गेल्या होत्या. गर्दीच्या ठिकाणी अज्ञात आरोपीने या पाचही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने…
स्वच्छतेचा अभाव,बेशीस्त वाहतूक,कचरा संकलन अनियमित. यावल प्रतिनिधी : दि.१ यावल शहरात दिवसभर आणि रात्री ठीक ठिकाणी कुत्रे संघटनात्मक हैदोस घालत आहे. कुत्रे मोठ्या संख्येने गल्ली-बोळात भर रस्त्यात हिंडत,फिरत,जोर जोराने भुंकून नागरिकांच्या अंगावर धावून जातात,चार चाकी दुचाकी वाहनांच्या मागे सुसाट वेगाने धावतात यात काही लहान मुलांना,पुरुषांना सुद्धा चावा घेतल्याने नागरिकांना दिवसा आणि रात्री रस्त्याने जाणे येणे मुश्किल झाले आहे अशी चर्चा यावल शहरात सर्वत्र पसरल्याने नागरिकांमध्ये कुत्र्यांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे यावल शहरात अनेक ठिकाणी झाडू मारला जात नसल्याने साफसफाई होत नाही, सार्वजनिक वापराच्या ठिकाणी आणि काही खाजगी मोकळ्या जागांच्या ठिकाणी केरकचरा,घाण जागोजागी पडलेली आहे,ओला व सुका कचरा संकलनाचे काम ठेकेदार नियमित…
चार महिन्यांच्या बालिकेसह सहा वर्षांच्या मुलाचाही करुण अंत,आरोपी पतीला अटक शिक्रापूर प्रतिनिधी : पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह आणि सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. पाबळ (ता. शिरूर) येथील एकेरी माळ परिसरात रविवारी (दि. १) ही हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) आणि गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी येथील असून, सध्या कामाानिमित्त पाबळ येथे वीटभट्टीवर वास्तव्यास…
उत्पादन घट व अवकाळी पावसाचा परिणाम; दैनंदिन आहारावर दरवाढीची झळ जळगाव प्रतिनिधी : डिसेंबर महिन्यात १२० रुपये किलो असलेले शेंगदाण्याचे दर जानेवारी अखेर थेट १८० रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, अवघ्या महिनाभरात तब्बल ६० रुपयांची दरवाढ झाली आहे. बाजारात नवीन शेंगदाण्याची आवक सुरू असली तरी यंदा अपेक्षेपेक्षा उत्पादन व आवक दोन्ही कमी असल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शेंगदाणा हा स्वयंपाकघरातील अत्यावश्यक घटक मानला जातो. भाजीपाला, उसळ, चटणी, पोहे, फराळ तसेच तेलासाठी मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्याचा वापर होतो. विशेषतः ग्रामीण भागात आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये प्रथिनांचा स्वस्त व महत्त्वाचा स्रोत म्हणून शेंगदाण्याला मोठे स्थान आहे. त्यामुळे झालेल्या दरवाढीचा थेट परिणाम दैनंदिन आहारावर…
पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी जळगाव, – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज,…
महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या जळगाव। अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार अशी चर्चा सुरू असतानाच आज, शनिवारी सायंकाळी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद…
जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. भुसावळ प्रतिनिधी : शिंदी (ता. भुसावळ): किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाच्या अनुपस्थितीमुळे शिंदी येथील गरोदर महिलेचा जीव धोक्यात आला. सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी रविवारी दुपारी २ ते ३ वाजता शिंदी येथील महक अलताफशहा या महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या. तिच्या नातेवाईकांनी किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका चालक झाकिर नजीर दरवेशी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने बाहेरगावी मुलगी बघायला गेल्याचे सांगून येणार नसल्याचे उत्तर दिले. नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलले, असा त्यांनी सांगितले की, चालक…
भुसावळातील दुचाकी शोरुम्सची तात्काळ तपासणी; भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरात कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांच्या टू-व्हीलर (दुचाकी) शोरुम्समध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी तात्काळ तपासणीचे आदेश जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शोरुम्सवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, यामुळे भुसावळ तालुक्यातील विनापरवाना व नियमबाह्य सुरू असलेल्या दुचाकी शोरुम चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी काढलेल्या आदेशानुसार भुसावळ शहरातील सर्व दुचाकी शोरुम्सची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत शोरुम्सकडे असलेली आवश्यक परवाने, अधिकृत नोंदणी, विक्री प्रक्रिया, वाहन नोंदणी संदर्भातील नियम,…
सीईओ मीनल करनवाल यांचे आदेश; मोकळ्या जागेवर होणार लोकहिताची नवी विकासकामे जळगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या परंतु सध्या वापरात नसलेल्या, अत्यंत जीर्ण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोकादायक ठरलेल्या इमारती व कार्यालये मोडीत काढण्यासाठी (निर्लेखित) विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, यामुळे जिल्ह्यातील अनेक जुन्या इमारतींचा प्रश्न निकाली लागणार आहे. सुरक्षिततेला प्राधान्य आणि संभाव्य अपघात टाळण्याचे उद्दिष्टजिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक कार्यालयीन इमारती अनेक वर्षांपासून रिकाम्या आहेत. दीर्घकाळ देखभाल न झाल्यामुळे या इमारतींची पडझड झाली असून त्या ‘अडगळीत’ पडल्या आहेत. काही ठिकाणी या इमारती सार्वजनिक…

