घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; जळगाव शहरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य घरफोडी टोळीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेले १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. जळगाव शहरातील आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे कुटुंबासह गावी धानवड येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात घरफोडी केली. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर पाटील यांनी घरी येऊन पाहणी केली असता लाकडी कपाट फोडलेले व त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक…
Author: Editorial Desk
धरणगावात बेकायदेशीर वास्तव्यास असलेली इराणी महिलेची होणार हकालपट्टी धरणगाव येथे गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या इराणी महिला फरनाज हमीद रेझा (वय ३८) आणि तिच्या मुलाची भारतातून इराण येथे हकालपट्टी केली जाणार आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथून दिल्लीला रेल्वेने, तर दि. ६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून विमानाने इराणला त्यांना रवाना करण्यात येणार आहे. यासाठी दोघांची विमान तिकिटेही काढण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील कुरेशी मोहल्ल्यात सदर इराणी महिला आपल्या मुलासह गेल्या एक वर्षापासून वास्तव्यास होती. याबाबतची माहिती धरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कुरेशी मोहल्ल्यातील एका घरातून महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणात त्या महिलेला बेकायदेशीर आश्रय देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला जळगाव | शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीवर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. ६ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कृषी उपअधिकाऱ्यासह दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , तक्रारदार हे जोगेवडगाव, ता. पाचोरा येथील शेतकरी असून त्यांनी शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत नांगर व रोटर खरेदीसाठी पाचोरा कृषी कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. अर्जास मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी साहित्य खरेदी केले. त्यानंतर खरेदी केलेल्या…
भुसावळ रेल्वे स्थानकाचा कायापालट,फलाट क्रमांक ७ व ८ ला आधुनिक ‘हायटेक’ रूप; भुसावळ प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांना वेग आला असून, त्याचाच भाग म्हणून फलाट क्रमांक ७ व ८ चे रूपडे पूर्णतः बदलण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणामुळे हे फलाट आता स्वच्छ, सुशोभित व ‘हायटेक’ स्वरूपात दिसत असून, प्रवाशांकडून या बदलाचे कौतुक होत आहे. फलाट परिसरातील रेल्वे रुळ, पाणी भरण्यासाठी असलेले लोखंडी पाईप्स तसेच इतर संरचनांना आकर्षक रंगसंगतीत रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी दुर्लक्षित व साधा भासणारा परिसर आता टवटवीत, स्वच्छ व देखणा दिसू लागला आहे. या बदलामुळे…
भुसावळ येथील संतोष माता हॉल वर केलेली कारवाई नियम बाह्य व अनपेक्षित – संस्थेचे व्हा चेअरमन वरूण इंगळे यांचे प्रतिपादन भुसावळ प्रतिनिधी : येथील संतोषी माता हॉल बांधण्यास कायदेशीर मान्यता नगरपालिकेने आम्हाला दिली होती . आम्ही त्याचा दर वर्षाला नगरपालिकेस लाखो रुपये टॅक्स भरत आहे . तेवीस वर्षा पासून ही इमारत उभी आहे . सदरची ही कारवाई करताना आम्हाला शंका वाटत असून आम्ही याबाबत न्यायालयात गेलो असून न्यायालयात आमचा खटला प्रलंबीत असून अधिकाऱ्यांकडून कारवाई होणे अपेक्षित नव्हते . यापूर्वी आम्हाला तीन वर्षाचा ठराव तसेच तीस वर्षाचा ठराव करून देण्यात आलेला होता तरीसुद्धा आमच्यावर कारवाई होणे हे अनपेक्षित आहे आम्ही याबद्दल लवकरच पत्रकार…
३१५ संस्कृत श्लोकांचे केले पाठांतर अहमदाबाद आधुनिक युगात जिथे तंत्रज्ञान मुलांचे लक्ष वेधून घेत आहे, तिथे आध्यात्मिक शिस्त आणि एकाग्रतेच्या जोरावर १२,७२३ बालकांनी एक नवा जागतिक इतिहास रचला आहे. ‘सत्संग दीक्षा’ ग्रंथातील तब्बल ३१५ संस्कृत श्लोक मुखोद्गत (कंठस्थ) करून या बाल विद्वानांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. एक अलौकिक आध्यात्मिक उपक्रम BAPS स्वामीनारायण संस्थेच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात हजारो मुलांनी सहभाग घेतला होता. कठीण संस्कृत श्लोक, त्यांचे अचूक उच्चार आणि पाठांतर यांमधील मुलांच्या कौशल्याने संपूर्ण जगाला थक्क केले आहे. केवळ पाठांतरच नव्हे, तर या मुलांनी दाखवलेली मानसिक दृढता हा या विक्रमाचा मुख्य आधार ठरला.…
संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,भुमिपुजन सोहळा जामनेर प्रतिनिधी : शेगांव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त शेंदुर्णीत श्री.संत गजानन महाराज भक्त परिवार यांच्या वतीने दि.४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.४ फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी ११ वा नियोजित संत श्री गजानन महाराज मंदिर भुमिपुजन सोहळा संत महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.गुरुवार दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता संत श्री गजानन महाराज यांचा अभिषेक व पुजा होईल.शुक्रवार दि.६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता संत श्री गजानन महाराज महिला भक्त मंडळ शेंदुर्णी यांची…
वसंत साखर कारखान्याचे पुनर्जीवन करण्याची मागणी जळगाव प्रतिनिधी । कासोदा येथील वसंत साखर कारखान्याचे पुनर्निर्माण व कार्यक्षम पुनर्जीवन करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर वसंत साखर कारखाना नवनिर्माण पुनर्जीवन समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेतर्फे संबंधित आमदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. समितीने कारखान्याचे पुन्हा चालू करणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. निवेदन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार राजाभाऊ, आमदार राजूमामा भोळे यांना देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव ईश्वर माधवराव पाटील तसेच प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील उपस्थित होते. समितीने कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी आणि स्थानिक रोजगारावर झालेल्या परिणामांची…
शिवजयंती उत्सवानिमित्त नाट्यमंदिर विद्युत रोषणाईसाठी निवेदन अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिमाखात साजरी केली जाणार आहे. या पवित्र दिवशी संपूर्ण तालुक्यातील शिवप्रेमी दर्शनासाठी व कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने नगरपरिषदेला नाट्यमंदिर सजावट व विद्युत रोषणाईसाठी निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्याकडे शहरातील सर्व परिसर स्वच्छ व आकर्षक ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच नाट्यमंदिराची आकर्षक सजावट, संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई, कार्यरत पथदिवे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची पॉलिशिंग करून उत्सवाची शोभा वाढवण्याची मागणी केली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, यामुळे केवळ शहराचा सौंदर्य आणि लौकिक वाढणार…
महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. जळगाव | जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महायुतीकडून आज या दोन्ही प्रतिष्ठेच्या पदांसाठी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विरोधीगटाकडून नावे न आल्याने भाजपाच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे. भाजपाचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. भाजपने ४६ पैकी ४६ जागांवर आणि शिवसेनेने २३ पैकी २२ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. निवडणुकीनंतर महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे…

