Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अजितदादा पवाराना मुक्ताईनगरात सर्वपक्षीय भावपूर्ण श्रध्दांजली !

ताज्या बातम्या

अजितदादा पवाराना मुक्ताईनगरात सर्वपक्षीय भावपूर्ण श्रध्दांजली !

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत अजितदादा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली

मुक्ताईनगर प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघातात निधन झाल्याने मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत अजितदादा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बुधवारी प्रवासादरम्यान झालेल्या विमान अपघातात अजितदादांचे निधन झाल्याची वार्ता समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी मुक्ताईनगर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा आणि बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या होत्या.

प्रवर्तन चौकात शोकसभा गुरूवार दुपारी १२ वाजता प्रवर्तन चौकात शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या प्रसंगी नगरपालिका सदस्य, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा उपस्थित नेत्यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांची प्रशासकीय पकड आणि सर्वसामान्यांच्या कामाची तळमळ ही सदैव प्रेरणादायी राहील. एका कणखर नेतृत्वाच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add