Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अवकाळी वादळी पावसाने आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

ताज्या बातम्या

अवकाळी वादळी पावसाने आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

आ. अमोल जावळे यांचे अवकाळी वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनाम्याचे आदेश.

यावल प्रतिनिधी : दि.२८ रावेर व यावल तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी वादळी पावसाने आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. जोरदार वादळासह झालेल्या गारांच्या माऱ्यानंतर आलेल्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.

या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या तडाख्याने हिरावून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असून ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. गारपिटीमुळे केळी, गहू, हरभरा, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांची पत्रे उडून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क केले आहे.दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी व पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील कार्यवाही युद्धपातळीवर राबवली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add