Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळमध्ये तरुणीवर अतिप्रसंग खळबळ जनक प्रकार ,आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये तरुणीवर अतिप्रसंग खळबळ जनक प्रकार ,आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 20, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

कार्यालयात बोलावून जबरदस्ती केल्याचा आरोप; फॉरेन्सिक तपासणीसह पोलिसांचा तपास गतीने

भुसावळ प्रतिनिधी : शहरातील एका २२ वर्षीय तरुणीवर ओळखीच्या व्यक्तीने कार्यालयात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी राजू गायकवाड याला तातडीने अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही टपाल विभागात कार्यरत असून ती भुसावळ येथे भाड्याच्या घरात राहत आहे. कामाच्या निमित्ताने तिची आरोपीशी पूर्वीपासून ओळख होती. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी आरोपीने तिला बसस्थानक परिसरात बोलावून घेतले व चर्चा करण्याच्या बहाण्याने मुक्ताई कॉलनीतील स्वतःच्या कार्यालयात नेले. तेथे दरवाजा बंद करून आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add