Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल येथील बंद घर फोडून सोन्याचे दागीन्यासह रोकड लंपास

ताज्या बातम्या

यावल येथील बंद घर फोडून सोन्याचे दागीन्यासह रोकड लंपास

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

दोन आठवड्यात तिसरी घटना उघडकीस

यावल : येथील विरार नगरातील रहिवासी शेख साबीर शेख प्यारे साहब कुटुंबा समवेत बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराचे कुलूपे तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयाच्या रोकड सह ३८ हजार रुपये किमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोने घरातील कपाटातून चोरून नेले. ही घटना दिनांक १६ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी चे रात्री दहा वाजेचे दरम्यान घडली. मागील १५ दिवसात याच परिसरातील चोरी ही तिसरी घटना असून याबाबतची फिर्याद शेख साबीर यांनी दिल्यावरून येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेले वृत्त असे की, येथील बुरुज चौकात बऱ्हाणपूर जिलेबीवाला म्हणून व्यवसाय करणारे शेख साबीर शेख प्यारेसाहब हे शहराच्या विस्तारित वसाहतीमधील विरार नगरात कुटुंबीयांसोबत राहतात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी कुटुंबीय समवेत ते बराणपुर येथे आई-वडिलांच्या भेटीसाठी जाताना घराचे दरवाजासह लोखंडी ग्रीलला कृपे लावून बऱ्हाणपूर येथे गेले.

दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता शेख साबीर कुटुंबीय समवेत बऱ्हाणपूर येथून यावल येथे घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजासह ग्रीलचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच घरातील लोखंडी कपाटाचे कुलपे तोडून सामान असता व्यस्त पडलेले होते. त्यांचे कपाटातील साडेपाच लाख रुपयाची रोकड त्यात पाचशे रुपये व दोनशे रुपयांच्या नोटा तसेच पत्नीचे काय ३८ हजार रुपये किमतीचे साडेसहा ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगा असा पाच लाख ८८ हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला असल्याचे दिसून आले.

याबाबतची फिर्याद शेख साबीर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्या आणि विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय कुमार वाढवे, फौजदार अनिल महाजन व पो. काॅ. सागर कोळी पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add