Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या» चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकीदरम्यान गाडी पार्किंगच्या कारणावरून शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

ताज्या बातम्या

 चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकीदरम्यान गाडी पार्किंगच्या कारणावरून शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 20, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगावमध्ये शिवजयंतीत वाद; एपीआयची तडकाफडकी बदली

जळगाव । चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकीदरम्यान गाडी पार्किंगच्या कारणावरून शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या झालेल्या वादानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीच्या मार्गावर वाहन उभे करण्याच्या मुद्द्यावरून शिवप्रेमी आणि एपीआय भरत चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद वाढत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एपीआय भरत चौधरी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर शहरात शांतता असून पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add