Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शासकीय कार्यालयाच्या समोर झोपेची खाट टाकून अनोखे असे आंदोलन करणार असल्याचा इशारा

ताज्या बातम्या

शासकीय कार्यालयाच्या समोर झोपेची खाट टाकून अनोखे असे आंदोलन करणार असल्याचा इशारा

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

झोपेची खाट टाकून अनोखे होणारे आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या तत्परतेने स्थगित.

भुसावळ प्रतिनिधी – सामाजिक आरोग्य व न्यायाच्या दृष्टीने तात्काळ कारवाई होण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या समोर झोपेची खाट टाकून अनोखे असे आंदोलन करणार असल्याचा इशारा तक्रारदार प्रमोद पाटील यांनी दिला होता त्यानुसार उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी तक्रारीची दखल घेत भुसावळ तहसीलदार आणि मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांना लेखी पत्र काढून तात्काळ स्थळ निरीक्षण करून योग्य ती कारवाई करावी व कार्यवाहीचा अहवाल सत्वर सादर करावा असे कळविल्याने खाट टाकून होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले .

भुसावळ भाग भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनी दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार भुसावळ आणि मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांना दिलेल्या लेखी पत्रात सर्वे क्र.११५/१/अ भुसावळ येथील श्रद्धा नगर संत गजानन महाराज देवस्थान येथील रहिवास असून त्या ठिकाणी अतिक्रमणाबाबत प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी तक्रार केली आहे. अर्जात नमुद मुद्याच्या अनुषंगाने स्थळ निरीक्षण करुन योग्य ती कार्यवाही करावी व ते अर्जदारास परस्पर कळवावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सत्वर सादर करावा असे कळविल्याने भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी आणि भुसावळ तहसीलदार प्रत्यक्षात काय कार्यवाही करतात याकडे तक्रारदार यांच्यासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add