Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ताज्या बातम्या

सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

वरणगाव शहरातील समस्यांकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष .मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा.

वरणगाव प्रतिनिधी :  वरणगाव शहर आणि परिसरातील महामार्गाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, विधानसभा प्रमुख संतोष माळी यांच्या सह सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामार्गावरील त्रुटींमुळे नागरिकांना होणारा त्रास त्वरित दूर न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी एका निवेदनाद्वारे NHAI जळगाव कार्यालयाला दिला आहे.


दिलेल्या निवेदनात समाधान महाजन आणि पदाधिकाऱ्यांनी वरणगाव परिसरातील पाच मुख्य मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मागण्या पुढील प्रमाणे आहेत. वरणगाव हे ५० हजार लोकसंख्येचे शहर असतानाही महामार्गावर तरसोद ते मलकापूर दरम्यान शहराचे नाव दर्शविणारे दिशादर्शक फलक नाहीत. यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी भुसावळकडून वरणगावकडे येताना फुलगावजवळ सर्व्हिस रोडवर वस्ती असूनही तिथे पथदिव्यांची सोय नाही. अंधारामुळे या ठिकाणी अनेकदा छोटे मोठे अपघात होतात. एखाद्या वेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुस्लिम कब्रस्तान आणि ऑर्डनन्स फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी अंडर बायपासजवळ उतरण्यासाठी योग्य जंक्शन नाही. वाहनधारकांच्या सोयीसाठी तिथे नवीन जंक्शन उभारण्यात यावे.


फुलगाव येथील रेल्वे पुलाखालील रस्ता अत्यंत खराब झाला असून पावसाळ्यात तिथे पाणी साचते. यामुळे पुला खालुन जातांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होते .पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करून रस्ता दुरुस्त करण्यात यावा. महात्मा ज्योतिबा फुले सर्कलजवळ प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिकअप शेड उभारण्यात यावे.


निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, वरणगाव शहर हे जिल्हयातील एक महत्त्वाचे केंद्र असूनही महामार्ग प्राधिकरणाकडून या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या विषयांचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास, जनसामान्यांच्या हितासाठी शिवसेना आपल्या खास शैलीत शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, संतोष माळी, विलास मुळे, माजी नगरसेवक गणेश धनगर, नगरसेवक विनोद झोपे, रवि कोल्हे, आणि शंकर लोखंडे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add