Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

ताज्या बातम्या

चार दिवसांतच कार अपघातात वर-वधूचा दुर्दैवी अंत !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

वाशी तालुक्यातील तरुण जोडप्याचे लग्नाचे स्वप्न साकार होण्यापूर्वीच हादरवून टाकणारी घटना घडली

जळगाव | वाशी तालुक्यातील तरुण जोडप्याचे लग्नाचे स्वप्न साकार होण्यापूर्वीच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या नववधू अक्षया सुनील चव्हाण (२३) आणि नवरा अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) यांचा दुर्दैवी मृत्यू सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर, रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कार धडकल्याने झाला. घटना रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया यांचा गत रविवारी मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी उत्साहात लग्नाची तयारी सुरू केली होती.

अपघाताच्या दिवशी नववधू अक्षया हिची महापरीक्षा लातूर येथे होती. सकाळी वाशी येथून टाटा नेक्सॉन (MH 25 BF 5064) कारने निघालेल्या दरम्यान, रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात थेट टोलवेच्या कमानीला धडकली. धडके इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत नववधू अक्षया सुनील चव्हाण आणि वर अक्षय रामभाऊ शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अक्षय यादव सिरसट (२२) गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.साखरपुड्यानंतर फक्त काही दिवसांत झालेल्या या अकाली मृत्यूमुळे वाशी तालुक्यात शोककळा पसरली असून कुटुंबीय, मित्रमंडळी आणि स्थानिक नागरिक या घटनेवर खंत व्यक्त करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add