Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शेतकरी कर्जमाफी मुद्दा गाजणार ! विधानसभेचे आजपासून अधिवेशन

ताज्या बातम्या

शेतकरी कर्जमाफी मुद्दा गाजणार ! विधानसभेचे आजपासून अधिवेशन

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 23, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. सत्ताधारी पक्षातर्फे आयोजित केलेल्या चहापाणीच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनात संदर्भात माहिती दिली. विरोधकांतर्फे कोंढवा जमीन प्रकरण, शेतकऱ्यांची कर्जमाफी हे प्रकरण गाजणार आहे. कोंढवा जमीन प्रकरणात खरगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण गाजणार आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. की खरगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चीट देऊ शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा या अधिवेशनात उचलला जाणार आहे. त्याला सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर दिले जाईल? हे पाहायचे आहे. एकंदरीत कोंढवा जमीन प्रकरण आणि शेतकरी कर्जमाफी प्रकरणानंतर अनेक मुद्दे असे आहेत, की जे क्राईमशी निगडित आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या विभागात जे लाचखोरीचे प्रकरण झाले ते मंत्रालया सारख्या ठिकाणी लाचेचे प्रकरण मंत्री झिरवाळ यांना चांगलेच भोवणार आहे. लाचेचे प्रकरण घडताच नरहरी झिरवाळ हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक धनंजय गाडे यांना कार्यमुक्त केले आहे. या आधीच कारकुनाला कामावरून कमी केले आहे. झिरवाळ म्हणतात, ‘माझ्याशी कुठलाही संबंध आला तर मी तातडीने राजीनामा देईल.’ पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी योग्य आहे.

परंतु मी कसलीही कसूर केलेली नाही. दुसरे लगेच प्रकरण बीड जिल्ह्यात घडले. परळीचे तहसीलदार 50 हजारची लाच घेताना रंगेहात पकडले गेले. त्याचबरोबर दोन पोलीस अधिकारी यांनी लाखोंची लाच घेतल्याचे प्रकरण गंभीर आहे. एकंदरीत लाच प्रकरण वाढल्याने चिंतेची बाब असून त्याचे प्रकरण विधानसभा अधिवेशनात गाजेल असे दिसते. राज्यसभेवर सात जागांसाठी निवड व्हायची आहे. तो मुद्दा येथे उपस्थित होईल. विरोधकांमध्ये एकमत होत नाही. राष्ट्रवादीचे शरद पवार यांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसचा विरोध असून त्यासाठी उद्धव ठाकरे यांची दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणे काय होते हे पाहायचे आहे. विधानसभा परिषदेची जागा सुद्धा शिवसेनेला देण्यात यावी, असा प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते स्वतःकडे घेतले असल्याने ते स्वतः अर्थसंकल्प मांडणार आहेत.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी देतील का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण त्याआधी जिल्हा बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजे यादी तयार करायला सांगितल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का? असा प्रश्न आहे. आणि झाली तर ती एक प्रकारची लॉटरीच आहे. जळगाव जिल्ह्यातील पोलीस खात्याचे अनेक प्रश्न आहेत. त्यातच सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रकरणांची चर्चा आहे. सावदा पोलीस स्टेशनमध्ये गौण खनिजेचे प्रकरण आहे. त्यातच सावदा पोलीस स्टेशनमध्ये विधवा महिलेवर बलात्काराचे प्रकरण गाजते आहे. हे सर्व प्रकरण एकनाथ खडसे हे विधानसभा अधिवेशनात विचारणार आहेत..!

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add