Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»निष्काम कर्मचारी संत गाडगेबाबा यांचा जयंती उत्साहात साजरी

जळगाव

निष्काम कर्मचारी संत गाडगेबाबा यांचा जयंती उत्साहात साजरी

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी !

जळगाव | निष्काम कर्मचारी संत गाडगेबाबा यांचा जयंती उत्सव दिनांक २३ फेब्रुवारी सोमवार रोजी जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ व समाजातील सर्व समाज संस्था, संघटना व मंडळे यांचे संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी संत गाडगेबाबा उद्यान येथून संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे, नगरसेवक सर्वश्री नितीन लढ्ढा,अरविंद देशमुख,कल्पेश सोनवणे, गणेश सोनवणे, दिपक सूर्यवंशी, अमर जैन, विशाल भोळे, विष्णू भंगाळे, निलेश तायडे, डॉ. विरेन खडके, उज्वला बेंडाळे, वैशाली पाटील व चेतन शिरसाळे, भूषण सोनवणे, राहुल पाटील यांचे हस्ते होऊन वाद्यांच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ झाला.

शोभायात्रेत सजविलेल्या रथामध्ये संत गाडगेबाबा यांची प्रतिमा होती व संत गाडगेबाबा यांची सजविलेली पालखी,उंटावर सजीव आरास तसेच पर्यावरण संरक्षण, सुरक्षित वाहतूक, बेटी बचाव बेटी पढाव, फास्ट फूडचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्व, गाडगेबाबा यांची दशसूत्री या विषयाचे प्रबोधनात्मक चित्ररथ होते संत गाडगेबाबा उद्यानातून सुरू झालेली ही शोभायात्रा,स्टेडियम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, जुने कोर्ट मार्गे संत गाडगेबाबा उद्यानात समारोप झाला शोभायात्रेत कोंबडी बाजार धोबी समाज मंडळाच्या एकसारख्या पिवळ्या पोशाख परिधान केलेले बंधू भगिनी तसेच संत गाडगेबाबा यांचे वेशात हातात खराटा घेऊन भूमिका साकारणारे भास्कर जुनागडे हे लक्ष वेधून घेत होते.

दुपार सत्रात समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक कलाबाई शिरसाळे, नलूबाई सोनवणे,गणेश सोनवणे व नितीन सपके तसेच दैनिक लोकमत तर्फे शौर्य पुरस्काराने सन्मानित MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी गणेश सुरेश ठाकरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला गोरगरिबांना अन्नदान कार्यक्रम त्यानंतर महाप्रसाद तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले शोभायात्रेत जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक मंडळ, कोंबडी बाजार परिसर धोबी मंडळ, जिल्हा धोबी समाज सर्व भाषिक संस्था, खोटे नगर परिसर धोबी समाज मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले असे जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे सचिव राजेश जाधव यांनी कळविले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add