Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»प्रसिद्ध अभिनेत्रीचा देहविक्रीचा व्यवसाय! रॅकेटचा भांडाफोड : कारण ऐकून व्हाल थक्क

ताज्या बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्रीचा देहविक्रीचा व्यवसाय! रॅकेटचा भांडाफोड : कारण ऐकून व्हाल थक्क

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रॅकेटवर छापा टाकला.

सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे कमावण्याचा वेगळा मार्ग निवडला. तिच्यावर वेश्या व्यवसाय चालविण्याची वेळ आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रॅकेटवर छापा टाकला. तसेच हा रॅकेट उधळून लावला. या प्रकरणानंतर मुंबईसह सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमधून, हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या एका २६ वर्षीय अभिनेत्रीला देहविक्रीचा व्यवसाय चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला गुप्त मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला. तसेच दोन पीडित महिलांची सुटका केली.

प्राथमिक चौकशीत, आरोपी महिला वेब सिरीजमधील काही अभिनेत्रींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांशी संपर्क साधत होती. तसेच यात टीव्ही कलाकारांचा सहभाग असल्याचे सांगून २५ हजार रुपयांची मागणी करत होती. प्रत्येक व्यवहारात ती कमिशन घेत होती.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले. तसेच आरोपी महिलेशी संपर्क साधला. ‘आमच्याकडे हिंदी वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुणी उपलब्ध आहेत’, असं आरोपीनं सांगितलं. व्यवहार ठरल्यानंतर दोन मुलींना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं. पोलिसांनी सापळा रचून हा डाव उधळून लावला. तसेच आरोपी महिलेला अटक केली.

पोलिसांना दिलेल्या जबाबात, आरोपीनं सांगितलं की, अभिनयाचे काम मिळण्यात अडचण येत होती, आर्थिक समस्या होती. बिहारमधील कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तिनं या व्यवसायात प्रवेश केल्याचं तिनं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, ११,६१० रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add