Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळात मध्यरात्री तरुणाचा खून ; घटनास्थळी पोलीस दाखल !

ताज्या बातम्या

भुसावळात मध्यरात्री तरुणाचा खून ; घटनास्थळी पोलीस दाखल !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

भुसावळ शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनीत रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२) यांचा एका व्यक्तीशी किरकोळ वाद झाला.

वादाचे रूपांतर बाचाबाचीमध्ये झाले आणि त्यातून संतापाच्या भरात आरोपीने सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल वाघ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली वेगवान केल्या असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add