Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.

ताज्या बातम्या

यावल एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.

Editorial DeskBy Editorial DeskMarch 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक.

यावल प्रतिनिधी : यावल कडून बोरावल गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ईको या वाहनाला जोरदार धडक दिल्याने आज सकाळी मोठा अपघात घडला.या अपघातात इको वाहन चालकासह सुमारे १० ते १२ लहान बालके तथा शालेय विद्यार्थी जखमी झाले तर २ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा आहे. या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांची सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाहतूक बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एस.टी बसचे वाहक एस.एम.पाटील व चालक ए.ए.तडवी हे होते.


घटनेनंतर परिसरात शैक्षणिक क्षेत्रात आणि संबंधित पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि सर्वांनी यावल ग्रामीण रुग्णालयात लहान लहान बालकांना पाहण्यासाठी गर्दी केली सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची यावल-टाकरखेडा मार्गावरील एसटी बस भालशिव पिंप्री फाट्यावरून जात असताना, भालशिव पिंप्रीकडून यावलच्या एका खासगी शाळेकडे विद्यार्थी घेऊन जाणारी एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची ईकोकार समोर आली. यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.

धडक जोरदार लागल्याने ईको कारमधील चालक व विद्यार्थी जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. बोरावल परिसरातील तसेच यावल शहरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.जखमी विद्यार्थ्यांवर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रथमोपचार केले. तर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयातदाखल करण्यात आले.यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

अपघातातील विद्यार्थी वाहतूक करणारी ईको कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळता बरोबर यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी यावल ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात भेट देऊन अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीमुळे आणि त्यांच्या शैक्षणिक हक्क आणि सुरक्षतेबाबत समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add