Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शिंदाडच्या युवकाची पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या,चोरीच्या खोट्या गुन्ह्यात गोवल्याने तरुणाने संपवले जीवन

ताज्या बातम्या

शिंदाडच्या युवकाची पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या,चोरीच्या खोट्या गुन्ह्यात गोवल्याने तरुणाने संपवले जीवन

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शिंदाड येथील २२ वर्षीय युवकाने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या

शिंदाड ता. पाचोरा : चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शिंदाड येथील २२ वर्षीय युवकाने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, शिंदाड येथील अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२) हा युवक पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात असलेल्या प्राणा बँकवेट हॉटेलमध्ये नोकरी करत होता. तो मागील काही महिन्यांपासून तेथे कामावर होता. दरम्यान, हॉटेलमध्ये चोरी झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात येऊन गुन्हा काबुल करण्यास हॉटेल संचालकांनी अतुल यास सक्ती करून सह्या घेतल्या. संबंधित व्यवस्थापनाने त्याच्यावर दबाव टाकून मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत मयत युवकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पुणे येथील सासवड रोड रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे पटरीवर अतुल याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. घटनेपूर्वी त्याने मोबाईलवर संदेश पाठवून आपल्यावर चोरीचा खोटा आरोप करण्यात आल्याचे तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याचे नमूद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी संबंधित हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य जबाबदार व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.या घटनेमुळे शिंदाड गावात शोककळा पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.मयत अतुल याच्यावर  त्याचे पश्चात आईवडील भाऊ असा परिवार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add