Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»पारोळा येथे मंगलपोत चोरणाऱ्या महिलेस रंगेहात पकडले

राजकारण

पारोळा येथे मंगलपोत चोरणाऱ्या महिलेस रंगेहात पकडले

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

बसस्थानकातच महिलांनी दिला बेदम चोप

पारोळा : सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू झाली असून प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली असून याचा फायदा काही भुरटे चोर घेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. याप्रमाणे पारोळा येथील बसस्थानकात मंगलपोत चोरणाऱ्या एका महिलेस महिलांनी रंगेहात पकडल्यानंतर तिला बेदम चोप दिला. परंतु वेळेतच पोलीस दाखल झाल्याने महिला बचावली.

सध्या लग्नसराई सुरू असून दि २५ रोजी लग्नाची मोठी तारीख असल्याने पारोळा शहरातील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यानिमित्ताने दोन ते तीन महिला चोरट्या महिला बसस्थानकात दाखल झाल्या होत्या. अनेक गाड्या भटकल्यानंतर त्यांनी फलाट क्रमांक सातवर उभी असलेली पारोळा-चाळीसगाव बसमध्ये प्रवाशांनी चढण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पाहून गर्दीत ललिता समाधान मुंगसे (रा. खडकी ता. चाळीसगाव), मनिषा सुभाष पाटील (रा. नेरपाट ता. अमळनेर) हे चढत असताना एका ३० ते ३५ वर्षीय महिला गर्दीत घुसली. आणि ललिता मुंगसे यांच्या गळ्यातील मंगल पोत ओढली.

याचा सुगावा लागताच या महिलेसह उपस्थित महिलांनी या चोरट्या महिलेला बेदम चोप दिला. क्षणातच बस स्थानकात मोठा जमाव झाला. यावेळी बसस्थानकावर उपस्थित असलेले पोलीस तुषार सोनवणे, समाधान लोखंडे व होमगार्ड महिलेने त्या चोर महिलेस गर्दीतून बाहेर काढले व पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता तिच्यासोबत अजून एक दोन चोरटे असल्याची माहिती समोर आली असून पारोळा पोलीस तपास करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add