Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»सुनसगाव येथील मधमाश्यांचा हल्ल्यात चौघे महिला जखमी

ताज्या बातम्या

सुनसगाव येथील मधमाश्यांचा हल्ल्यात चौघे महिला जखमी

Editorial DeskBy Editorial DeskMarch 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

शेती शिवारात हरभरा कापणीच्या कामाला महिला गेलेल्या असतांना त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला .

भुसावळ प्रतिनिधी – तालुक्यातील सुनसगाव येथील शेती शिवारात हरभरा कापणीच्या कामाला महिला गेलेल्या असतांना त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला . त्यामुळे चार महिला जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत माहिती अशी की १ मार्च रोजी सकाळी १० वाजता येथील शेतकरी एकनाथ गोविंदा भोळे यांच्या गोजोरा रस्त्यावर असलेल्या गावानजिक च्या शेतात चारुलता एकनाथ भोळे व सोबत गावातील महिला अनिता सतिश पाटील , रंजना रोहिदास पाटील तसेच एक आदिवासी पावरा महिला अशा चौघी महीला हरभरा पिकाची कापणी करीत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला.

त्यामुळे या महिलांनी वाचवा वाचवा म्हणत गावाकडे पळ काढला मात्र मधमाश्यांनी पाठलाग केला व चावा घेतला . दंश झालेल्या भागात आग होत असल्याने महिलांनी पाण्याच्या हौदात उतरुन बचाव करण्याचा प्रयत्न केला तरीही मधमाशांनी हल्ला सुरूच ठेवला त्यामुळे या सर्व महिला जखमी झाल्या आहेत . यात शेतमालक चारुलता एकनाथ भोळे या गंभीर जखमी झाल्या ताबडतोब ग्रामस्थांनी गावातील दवाखान्यात दाखल करुन उपचार केले आता सर्व जखमी महिलांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले आहे.दरम्यान, शेत शिवारात जाताना शेतकरी तसेच शेतमजूर यांनी मधमाश्याच्या पोळा पासून काळजी घ्यावी असे यावेळी बोलले जात होते.जखमींवर डॉ.सागर धनगर यांनी उपचार केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add