Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»खान्देशवासीयांचे आराध्य दैवत प्रतिजेजुरी खंडोबाराया यांच्या फैजपूर येथील भव्य यात्रोत्सवास प्रारंभ

ताज्या बातम्या

खान्देशवासीयांचे आराध्य दैवत प्रतिजेजुरी खंडोबाराया यांच्या फैजपूर येथील भव्य यात्रोत्सवास प्रारंभ

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 2, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

फैजपूरला आजपासून भरणार खंडोबाची भव्य यात्रा : प्रशासन सज्ज, हजारोंच्या संख्येने येणार भाविक भक्त

प्रा. उमाकांत पाटील

फैजपूर प्रतिनिधी : खान्देशवासीयांचे आराध्य दैवत प्रतिजेजुरी खंडोबाराया यांच्या फैजपूर येथील भव्य यात्रोत्सवास
प्रारंभ झाला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश
व इतर विविध राज्यांतून व्यापारी व भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दरवर्षी लाखो भाविक या
यात्रेस उपस्थित राहत असून कर्णछेदनासारखे धार्मिक विधीही येथे मोठ्या प्रमाणावर पार पडतात. सुमारे २००
वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या खंडोबा देवस्थानातील मूर्ती अत्यंत प्राचीन असून ती इंदूरचे होळकर सरकार यांची
देणगी असल्याचे सांगितले जाते. मूर्ती न्हावी गावाकडे नेत असताना बैलगाडी अचानक थांबली व पुढे सरकली
नाही. त्यानंतर फैजपूरवासीयांना स्वप्नदृष्टांत होऊन याच ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आदेश मिळाल्याने
गावकऱ्यांच्या सहकार्याने याच ठिकाणी खंडोबा देवस्थान उभारण्यात आले. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेस प्राणप्रतिष्ठा
झाल्यापासून दरवर्षी या दिवशी यात्रा भरण्याची परंपरा सुरू झाली.

यावर्षी यात्रोत्सव दि. २ मार्च ते ९ मार्च या कालावधीत आठ दिवस रंगणार असून २ मार्च रोजी भाविकांकडून भंडारा
उधळून यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यात्रेचे काटेकोर नियोजन खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर
पुरुषोत्तमदासजी महाराज, उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवनदासजी महाराज तसेच पुजारी राम मनोहरदाजी
महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. संत-महंत, लोकप्रतिनिधी व नगरवासीयांच्या सहकार्याने
हा धार्मिक सोहळा भव्यदिव्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


देवस्थान परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून दररोज सकाळ-संध्याकाळ शिवस्तुती, रामरक्षा, रामस्तुती, जानकीस्तुती व खंडोबास्तुती असे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. विविध पंथ-संप्रदायांना
एकत्र आणण्याचे महाराजांचे कार्य विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अध्यक्ष महंत नृत्यगोपालदासजी म हाराज (अयोध्या) यांनी या यात्रेस आशीर्वाद दिले असून यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी
नगरपालिका, पोलीस प्रशासन, शासकीय अधिकारी व समस्त फैजपूरवासीयांचे ‘सहकार्य लाभत आहे.
सर्व भाविकांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज व पवनदासजी
महाराज यांनी केले आहे. यात्रेत मनोरंजन कार्यक्रम,भांड्यांची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, पाळणे,
मौतका कुवा, लोकनाट्य तसेच विविध व्यापारी उपक्रमांनी परिसर गजबजला असून फैजपूर नगरी धार्मिक, सामाजिक
व आर्थिक महोत्सवासाठी सज्ज झाली आहे. यात्रेतील भाविकांसाठी फैजपूर येथील डॉक्टरांचे पथक मोफत
वैद्यकीय उपचारासाठी अहोरात्र सज्ज ठेवण्यात आले आहे.


यात्रोत्सव सुरळीत, शांततामय व सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस व महसूल प्रशासन पूर्ण
दक्षतेने कार्यरत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ए.पी.आय. रामेश्वर मोताळे, पी.एस.आय. नीरज
बोकील, पी.एस.आय. विनोद गाभणे, मैनुद्दीन सय्यद, गुप्त खात्याचे विजय चौधरी, राहुल नावकर, ज्ञानेश्वर
चौधरी, अमजत पठाण, अनिल पाटील, अब्बास तडवी, समाधान पाटील, संजय झाल्टे, संतोष चौधरी, देविदास
सूरदास, मोती पवार, देवेंद्र पाटील, रशीद तडवी, रविंद्र मोरे, आशा तडवी, हर्षा चौधरी, शारदा देवगिरी यांच्यासह
संपूर्ण पोलीस कर्मचारी सतर्क आहेत. होमगार्ड ऑफिसर विकास कोल्हे, संजय कोल्हे, रोहिदास चौधरी, सुनील क्षत्रिय, श्रीकांत इंगळे यांच्यासह होमगार्ड दल देखील तैनात आहे. वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता महाजन व त्यांचा कर्मचारी वर्ग वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच प्रांताधिकारी डॉ. बबन काकडे, तहसीलदार
मोहनमाला नाझीरकर, फैजपूर भाग सर्कल गजेंद्र शेलकर, बी. एल. तायडे, तलाठी तेजस पाटील, श्रीकांत केंद्रे, संजू
राजपूत यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी वकर्मचारी आणि दक्षता समितीचे कार्यकर्ते यात्रेच्या यशस्वी
आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add