Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना

जळगाव

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना

Editorial DeskBy Editorial DeskMarch 4, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मेहरूणमध्ये जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर किरकोळ दगडफेक देखील झाली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यापैकी भाजपाचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात धुलिवंदनाच्या दिवशी गालबोट लागले आहे. साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर किरकोळ दगडफेक देखील झाली. यात घराच्या गेटची तोडफोडही करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, एमआयडीसी पोलिस ठाण्याबाहेर दोन्ही गटातील नागरिकांचा जमाव जमल्याने दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन्ही गटांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान पोलिसांनी दगडफेक झाली नसून जुन्या वादातून किरकोळ वाद झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यापैकी भाजपाचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add