Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण : पळवून नेल्याची धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचे अपहरण : पळवून नेल्याची धक्कादायक घटना

Editorial DeskBy Editorial DeskMarch 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला

जळगाव – शहरातील दादावाडी परिसरात राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी २ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समोर आली आहे. याबाबत मंगळवारी ३ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव शहरातील दादावाडी परिसरात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान, सोमवारी २ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add