Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार पीडित मुलगी गर्भवती : शिक्षकाला ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार पीडित मुलगी गर्भवती : शिक्षकाला ठोकल्या बेड्या

Editorial DeskBy Editorial DeskMarch 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आल आहे.

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आल आहे. शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनी गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ नराधाम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित विद्यार्थिनी घारगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. तिची कौटुंबिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ती नेहमी मानसिकदृष्ट्या खचलेली आणि एकटी असायची. तिचे वडील कामासाठी बाहेर असायचे. तर तिचा भाऊ कॉलेजला जातो. तर आई कामात व्यग्र असायची. यामुळे तिला नेहमी उपेक्षित वाटायचं.

मुलीच्या याच मानसिक अवस्थेचा नराधम शिक्षकाने गैरफायदा घेतला. पीडित मुलगी सातवीत असल्यापासून नराधम शिक्षक जवळीक वाढवत होता. नराधम शिक्षकाने डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. मुलगी घरी एकटी असायची, त्यावेळी आरोपी तिच्या घरी जाऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा.

गेल्या दोन वर्षांपासून नराधमाकडून गंभीर प्रकार सुरू होता. काही दिवसांपूर्वी काळात मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे विद्यार्थिनीला पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयात उपचारासाठी नेलं. डॉक्टरांनी तपासणीत केल्यानंतर विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना कळवळ्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

याप्रकरणी आरोपी शिक्षकावर भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमे आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिरो क्रमांकाने नोंदवलेला हा गुन्हा पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी तातडीने नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्यात. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add