Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद, गुजरात) येथे जाणाऱ्या पारंपरिक पदयात्रेला यंदा मोठ्या उत्साहात प्रारंभ

ताज्या बातम्या

प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद, गुजरात) येथे जाणाऱ्या पारंपरिक पदयात्रेला यंदा मोठ्या उत्साहात प्रारंभ

Editorial DeskBy Editorial DeskMarch 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

एकात्मतेचे दर्शन : पदयात्रेत पायी चालणे एक प्रकारचे तप

धानोरा ता. चोपडा ; येथून प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद, गुजरात) येथे जाणाऱ्या पारंपरिक पदयात्रेला यंदा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. धानोरा येथून सुरू झालेली ही पदयात्रा यंदा 17 व्या वर्षात प्रवेश करत असून 5 मार्च ते 19 मार्च या कालावधीत चालणार आहे.पदयात्रेचा शुभारंभ परमपूज्य महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते पालखी पूजन व धर्मध्वज पूजन करून करण्यात आला. परमात्म्याकडे स्वतः पायी चालत जाणे ही श्रद्धेची भावना मनात ठेवून धानोरा तसेच परिसरातील विविध गावांमधून आलेल्या भाविकांनी या पदयात्रेत उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्व समाजातील स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी तसेच अबालवृद्ध अशा सुमारे 60 भाविकांचा या पदयात्रेत समावेश आहे.

या पदयात्रेत पायी चालणे हे एक प्रकारचे तप मानले जाते. श्रद्धेने सतपंथी भक्त ‘निष्कलंकी नारायण’चा नामघोष करत, सत्संगाचा लाभ घेत आणि सतपंथ परंपरेचा प्रसार करत पिराणा येथे पोहोचतात. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2009 पासून या पदयात्रेची परंपरा सुरू आहे. सुरुवातीच्या काळात ही पदयात्रा सुरत ते प्रेरणापीठ पिराणा अशी पाच वर्षे काढण्यात आली होती. त्यानंतर धानोरा येथून पदयात्रेची सुरुवात करण्यात येत असून दरवर्षी भाविकांचा प्रतिसाद वाढत आहे.

या पदयात्रेत मार्गातील मुक्कामस्थळांवरून अनेक भाविक सहभागी होत जात असल्याने यात्रेचे स्वरूप अधिक व्यापक होत जाते. पदयात्रेदरम्यान दररोज सकाळ-संध्याकाळ महाआरती, प्रभाती पूजा तसेच हंसतेजजी महाराजांचा सत्संग आयोजित केला जातो. मार्गातील अनेक गावांतील भाविक पदयात्रींसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करतात.

फैजपुर, धानोरा, चोपडा, जांभोरा, शेंदुर्णी, शिरपूर, शहादा, तळोदा, कुकरमुंडा, डेडियापाडा, राजपीपला आदी भागांतील भाविक या पदयात्रेत सहभागी होत असल्याने यात्रेचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत आहे. गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध) दिवशी पिराणा येथे या पदयात्रेची पूर्णाहुती होते. त्या वेळी सर्व सतपंथी भाविक एकत्र जमतात. पिराणा येथील गादीपती परमपूज्य जगतगुरू सतपंथाचार्य ज्ञानेश्वरदासजी महाराज यांचे मार्गदर्शनपर संबोधन होते. त्यामध्ये उपासना मार्ग, कळसपूजा, ज्योतवारी यज्ञ तसेच सतपंथातील शंभर क्रियांची माहिती दिली जाते. व्यसनमुक्ती, उपासना-भक्ती आणि सद्गुरू हंसतेजजी महाराजांचे ज्ञान भजनांच्या माध्यमातून सांगितले जाते.

याप्रसंगी परमपूज्य महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज, सर्व मुखी महाराज, सतपंथ ज्योत मंदिरचे अध्यक्ष व संचालक मंडळ, ईश्वर मुखी, कमलाकर मुखी, कशेरलाल मुखी, सतपंथ ज्योत मंदिर सेवक धनराज चौधरी, सतपंथ ज्योत मंदिर धानोरा ट्रस्टी, फैजपुर संस्थानचे कार्यकर्ते तसेच महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add