Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»नशिराबाद येथील लहान मुलांच्या भांडणावरून कुटुंबातील चौघांना मारहाण

ताज्या बातम्या

नशिराबाद येथील लहान मुलांच्या भांडणावरून कुटुंबातील चौघांना मारहाण

Editorial DeskBy Editorial DeskMarch 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील परकोट मोहल्ला येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून कुटुंबातील चौघांना शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अन्वरउल्ला शेख रूउल्ला वय ४५ रा. मनियार वाडा, नशिराबाद हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २ मार्च रोजी रात्री ८ वाजता गावात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शेख अन्वरउल्ला व त्यांच्या पत्नी, मुलगा आणि पुतण्या यांना शरीनबी अफसर खान, अफसर खॉन शेर खॉन दोन्ही रा. नशिराबाद यांनी शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर शेख अन्वरउल्ला यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या दोघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add